Home बातम्या PUBG मध्ये चिकन डिनर करून या तरुणांनी जिंकले 42 लाख रुपये, आता विदेशात जाऊन खेळणार भारतासाठी

PUBG मध्ये चिकन डिनर करून या तरुणांनी जिंकले 42 लाख रुपये, आता विदेशात जाऊन खेळणार भारतासाठी

जुन्या काळात असे म्हटले जायचे कि फक्त शिकून मोठे होता येते खेळून नाही पण आता जग बदलले आहे खेळून पण तुम्ही स्टार बानू शकता. परंतु तुम्हाला माहित आहे का ऑनलाइन गेमने पण तुम्ही स्टार बनून लाखात कमाई करू शकता. याचे जिवंत उदाहरण भारतातील चार मुलांनी दिले आहे.

आम्ही बोलत आहोत ऑनलाइन गेम PUBG मोबाईल बद्दल. भारतात पबजी च्या बाजूने चांगल्या बातम्या कमीच आल्या आहेत. भारतातील अनेक राज्यांत हा बॅन करण्याची मागणी करण्यात आली आहे तर काही ठिकाणी हा बॅन करण्यात आला आहे. असे सर्व असताना पबजी ची टूर्नामेंट झाली त्यात 4 भारतीयांच्या टीम ने जवळपास 42 लाख रुपयांचे बक्षीस जिंकले आहे.

दरवर्षी पबजी टूर्नामेंटचे आयोजन करते, जिचे नाव पबजी मोबाईल क्लब ओपन (PUBG Mobile Club Open-PMCO) आहे. चार भारतीयांनी आपली टीम (टीम सोल) बनवली आणि टूर्नामेंट मध्ये भाग घेतला. रिपोर्ट्स नुसार त्यांनी 6 सामने खेळले आणि सर्व जिंकले.

मीडिया रिपोर्ट्स नुसार या टीमला बक्षीस म्हणून 60 हजार यूएस डॉलर (जवळपास 42 लाख) रुपये मिळतील. तसेच आता चार तरुणांची हि टीम बर्लिन मध्ये होणाऱ्या ग्लोबल फाइनल मध्ये भाग घेण्यास जात आहे.

टीम सोल मध्ये चार भारतीय आहेत जे बर्लिन मध्ये भारतचे प्रतिनिधित्व करतील. ते PMCO ग्लोबल फाइनल मध्ये भाग घेतील. फाइनल जिंकणाऱ्याला जवळपास 17.48 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील.