Home बातम्या 9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 6जीबी रॅम, डुअल सेल्फी कॅमेरा आणि 4,000एमएमएच बॅटरी असलेला Infinix Hot 7 Pro

9,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 6जीबी रॅम, डुअल सेल्फी कॅमेरा आणि 4,000एमएमएच बॅटरी असलेला Infinix Hot 7 Pro

Infinix India ने काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आपला लो बजेट स्मार्टफोन Infinix S4 लॉन्च केला होता. 32-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असलेला हा फोन कंपनी 8,999 रुपयांमध्ये विकत आहे. आज पुन्हा देशात आपल्या स्मार्टफोन्सची संख्या वाढवत कंपनीने एक आणि नवीन डिवाईस Hot 7 Pro लॉन्च केला आहे. Infinix ने हा फोन 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन ब्रँडचा नव्हे तर देशातील सर्वात स्वस्त 6जीबी रॅम असलेला फोन बनला आहे.

डिजाईन व लुक
Infinix Hot 7 Pro कंपनी द्वारा नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फोनच्या तिन्ही कडा नॅरो बेजल्स वाल्या आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्ले वर कोणताही फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही. हॉट 7 प्रो च्या बॅक पॅनल वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅश लाईट पण आहे. बॅक पॅनल वरच फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे ज्याच्या खाली Infinix ची ब्रँडिंग आहे. वाल्यूम रॉकर आणि पावर बटण फोनच्या उजव्या पॅनल वर देण्यात आले आहेत.

स्पेसिफिकेशन्स
Infinix ने Hot 7 Pro स्मार्टफोन 6.19-इंचाच्या एचडीप्लस डिस्प्ले वर सादर केला आहे जो 2.5 कर्व्ड ग्लासने प्रोटेक्टेड आहे. एंडरॉयड ओएस आधारित हा स्मार्टफोन मीडियाटेक के पी22 चिपसेट वर चालतो. Infinix Hot 7 Pro भारतात 6जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे. या फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Infinix Hot 7 Pro डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी पण या फोन मध्ये डुअल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअप मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

Infinix Hot 7 Pro डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Hot 7 Pro मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. इनफिनिक्सचा हा नवीन फोन मीडनाईट ब्लॅक आणि एक्वा ब्लू कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे.

किंमत व उपलब्धता
Infinix ने Hot 7 Pro 9,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो येत्या 22 जून पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. आपल्या फॅन्ससाठी कंपनीने लॉन्च ऑफरची सुरवात केली आहे. Infinix Hot 7 Pro 17 जून पासून 21 जून पर्यंत 1,000 रुपयांनी कमी किंमतीत विकत घेता येईल. म्हणजे या 5 दिवशी इनफिनिक्स हॉट 7 प्रो फक्त 8,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.