इंफिनिक्सने भारतीय बाजारात आपल्या नोट 40 सीरीज रेसिंग एडिशन मोबाईलला लाँच केले आहे. यानुसार Infinix Note 40 Pro आणि Infinix Note 40 Pro Plus Racing Edition सादर झाले आहेत. विशेष म्हणजे कंपनीच्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त स्मार्टफोनला वेगळ्या डिझाईनसह आणले गेले आहे. चला, पुढे किंमत, स्पेसिफिकेशन, सेलची माहिती आणि ऑफर बाबत सविस्तर जाणून घेऊया.
Infinix Note 40 Racing Edition ची किंमत, ऑफर आणि सेलची माहिती
इंफिनिक्सने भारतात नोट 40 रेसिंग एडिशनला दोन मॉडेलमध्ये लाँच केले आहे. यात नोट 40 प्रो मॉडेलच्या 8 जीबी +256GB स्टोरेजची किंमत 15,999 रुपये आहे. तर नोट 40 प्रो प्लस 12 जीबी +256GB मॉडेल 18,999 रुपयांना आहे. या किंमतीत बँक ऑफरचा पण समावेश आहे. तसेच, तुम्ही नवीन रेसिंग एडिशन फोन फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्मवरून खरेदी करू शकता.
Infinix Note 40 Racing Edition मध्ये काय आहे वेगळे
- इंफिनिक्सने नोट 40 आणि नोट 40 प्रो ला नवीन अंदाजमध्ये आणण्यासाठी BMW ग्रुपच्या कंपनी Design Works सह भागेदारी केली आहे.
- फोनच्या बॅक पॅनलवर ग्लॉसी फिनिश आहे ज्याला PC+PMMA (ऑर्गेनिक ग्लास) मटीरियल आणि UV ट्रांसफर प्रिंटिंग प्रक्रियाने बनविले गेले आहे.
- तुम्ही नवीन सिल्व्हर कलरमध्ये इंफिनिक्स ब्रँडचा लोगो पण पाहू शकता.
- रिअर कॅमेरा पॅनल सेटअप नोट 40 प्रो+ सारखा वाटत आहे, परंतु यात BMW कलर आहेत.
- फोनमध्ये वॉलपेपर, UI, थीम आणि आयकॉन नवीन एडिशनसाठी आहे. हेच नाही तर डिव्हाईस काही BMW थीम असणाऱ्या सामानासह कस्टमाईज्ड रिटेल बॉक्ससह मिळेल.
Infinix Note 40 Racing Edition चे स्पेसिफिकेशन
- डिस्प्ले: नोट 40 प्रो आणि नोट 40 प्रो+ रेसिंग एडिशन फोनमध्ये पण पहिल्याप्रमाणे 6.78-इंचाचा FHD+ 120Hz रिफ्रेश रेट असलेला अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन पण आहे.
- चिपसेट: दोन्ही फोन रेगुलर एडिशन मॉडेल प्रमाणे MediaTek Dimensity 7020 प्रोसेसर मिळत आहे.
- कॅमेरा: नोट 40 प्रो आणि नोट 40 प्रो+ मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108MP चा प्रायमरी आणि 2MP+2MP ची इतर लेन्स आहे. तसेच, सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी आणि चार्जिंग: प्रो मॉडेलमध्ये 5,000mAh बॅटरीसह 45W चार्जिंग आहे. तर प्रो+ मॉडेल 4,600mAh बॅटरी आणि 100W चार्जिंगसह आहे.
