Home बातम्या लाँचपूर्वी समोर आले Infinix Zero Flip स्मार्टफोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन, लवकरच होईल एन्ट्री

लाँचपूर्वी समोर आले Infinix Zero Flip स्मार्टफोनचे संपूर्ण स्पेसिफिकेशन, लवकरच होईल एन्ट्री

Infinix Zero Flip स्मार्टफोन लवकरच जागतिक बाजारात लाँच होणार आहे. यासंदर्भात ब्रँडने एक टिझरही जारी केला आहे. तर, बाजारात येण्यापूर्वी या फोल्डेबल फोनबद्दलची बरीच माहिती लीक झाली आहे. वास्तविक, एका जागतिक किरकोळ विक्रेत्याकडून त्याचे संपूर्ण स्पेसिफिकेशन शेअर करण्यात आलेले आहेत. तुम्हाला सांगतो की कंपनीने अद्याप डिव्हाईसची लाँच तारीख जाहीर केलेली नाही, परंतु त्याला या महिन्यातच एन्ट्री मिळू शकते.

Infinix Zero Flip चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

लीकनुसार, Infinix Zero Flip 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेली 6.7 इंचाची एफएचडी+ ॲमोलेड प्रायमरी फोल्डेबल स्क्रीन दिली जाऊ शकते. तर 120Hz रिफ्रेश रेट असलेला 3.64 इंचाचा ॲमोलेड सेकंडरी डिस्प्ले प्रदान केला जाऊ शकतो. असे सांगण्यात आले आहे की याची आऊटर स्क्रीन गोरिला ग्लास प्रोटेक्शन सह येऊ शकते.

चिपसेट

Infinix Zero Flip 5G स्मार्टफोनमध्ये ब्रँड परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक डायमेंसिटी 8020 चिपसेट लावू शकतो. ही मीडियाटेक चिप 6 एनएम प्रोसेस वर आधारित आहे. ज्यामध्ये ऑक्टा-कोर सीपीयू आहे आणि त्याचे क्लॉक स्पीड 2.6 गिगाहर्ट्झ पर्यंतचे आहे.

स्टोरेज आणि रॅम

Infinix Zero Flip मोबाईलमध्ये स्टोरेज आणि रॅम साठी, ब्रँड एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि यूएफएस 3.1 इंटरनल स्टोरेज तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. रिपोर्ट्सनुसार ग्राहकांना 8 जीबी पर्यंत रॅम मेमरी आणि 512 जीबी पर्यंतचे भरपूर स्टोरेज मिळू शकते.

कॅमेरा

Infinix च्या या फोल्डेबल डिव्हाईसमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी आणि 10.8 मेगापिक्सेलचा सेकेंडरी सेन्सर असू शकतो. तर, समोर 12 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा लावला जाऊ शकतो. संगण्यात आले आहे की समोर आणि मागील दोन्हींमध्ये 30fps 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगचा सपोर्ट मिळू शकतो.

बॅटरी आणि चार्जिंग

मोबाईल चालवण्यासाठी यामध्ये 70W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,590mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. या बॅटरी आणि शक्तिशाली जलद चार्जिंग मुळे डिव्हाईस दीर्घ बॅकअप आणि त्वरीत पूर्ण चार्ज होईल.

इतर

Infinix Zero Flip फोनमध्ये स्टीरिओ स्पीकर, ड्युअल उच्च-गुणवत्तेचे मायक्रोफोन आणि डीटीएस, हाय-रेंज ऑडिओसह टीयूव्ही सर्टिफिकेशन चा सपोर्ट मिळणार असल्याचे समोर आले आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत यात 5G, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.3, एनएफसी आणि यूएसबी-सी पोर्ट समाविष्ट असू शकतात. तर, सुरक्षेसाठी साईड-फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो.

ऑपरेटिंग सिस्टम

ऑपरेटिंग सिस्टमबद्दल बोलायचे तर आगामी Infinix Flip डिव्हाईस अँड्रॉईड 14 वर आधारित एक्सओएस 14.5 आणि एआय तंत्रज्ञान असणारा असू शकतो.

Infinix Zero Flip चे डिझाईन

लीकनुसार डिव्हाईस काळ्या आणि गुलाबी सारख्या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध होऊ शकतो. यात मोठी सेकंडरी स्क्रीन आणि त्याच्या वर दोन कॅमेरे असतील. यात समोरील बाजूस फ्लॅट डिझाईन दिसून येते. एकूणच पाहिल्यास हा बजेटमध्ये एक शक्तिशाली ऑफर बनू शकतो.