टेक कंपनी इंटेक्स ने मागच्या आठवड्यात भारतीय बाजारात दोन नवीन स्मार्टफोन इनफाई 3 आणि इनफाई 33 लॉन्च केले होते. हे दोन्ही स्मार्टफोन बेजल लेस डिजाईन सह फुलव्यू डिस्प्ले सह येतात. आज पुन्हा इंडियन मार्केट मध्ये आपल्या स्मार्टफोंस ची संख्या वढावत इंटेक्स ने अजून एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. इंटेक्स ने इंडी 5 भारतात लॉन्च केला आहे जो 4,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव विकला जाईल.
इंटेक्स इंडी 5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 1280 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 5-इंचाच्या एचडी आईपीएस डिस्प्ले सह सादर केला जाईल जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड नुगट आधारित आहे त्याचबरोबर हा 1.25गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटी6737 चिपसेट वर चालतो
कंपनी ने या फोन 2जीबी रॅम दिला आहे. हा फोन 16जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल तसेच फ्रंट पॅनल दोन्ही बाजूला 8-मेगापिक्सल चा रियर व सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे तर फोटो चांगले येण्यासाठी दोन्ही कॅमेरा सेटअप सोबत एलईडी फ्लॅश आहे.
इंटेक्स इंडी 5 डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन ओटीजी सपोर्ट पण देण्यात आला आहे. हा फोन 22 भारतीय भाषा समजण्यास सक्षम आहे तसेच पावर बॅकअप साठी इंटेक्स इंडी 5 4,000एमएएच च्या बॅटरी सपोर्ट सह येतो. हा फोन ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये फक्त 4,999 रुपयांमध्ये फ्लिपकार्ट वरून विकत घेता येईल.
