iQOO ची निओ 10 सीरीज या वर्षाच्या अखेरीस येण्याची अपेक्षा आहे. यामध्ये iQOO Neo 10 आणि iQOO Neo 10 Pro हे मोबाईल्स चीनच्या होम मार्केटमध्ये येऊ शकतात. हे गेल्या वर्षीच्या निओ 9 सीरीजचे अपग्रेड ठरेल. तथापि त्याची अधिकृत घोषणा अद्याप प्रतीक्षेत असली तरी, त्याआधी आगामी फोनचे प्रमुख स्पेसिफिकेशन समोर आले आहे. चला, पुढे त्यांचे तपशील जाणून घेऊया.
iQOO Neo 10 सीरीज चे प्रमुख स्पेसिफिकेशन (लीक)
- iQOO Neo 10 सीरीजमध्ये येणाऱ्या बेस आणि प्रो मॉडेल्सचे तपशील मायक्रो ब्लॉगिंग साइट विबो वर टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने शेअर केले आहेत.
- लीकनुसार, iQOO Neo 10 सीरीज स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 आणि मीडियाटेक डायमेंसिटी 9400 चिपसेट सह येऊ शकते.
- बेस मॉडेल iQOO Neo 10 फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट मिळण्याची शक्यता आहे. तर Pro मध्ये डायमेंसिटी 9400 स्थापित केला जाऊ शकतो.
- iQOO Neo 10 सीरीज मध्ये मेटल मिडल फ्रेम असण्याची शक्यता आहे. हे मागील मॉडेलचे अपग्रेड असेल कारण Neo 9 सीरीज मध्ये प्लास्टिकची फ्रेम आहे.
- iQOO neo 10 फोन मध्ये अल्ट्रा-नॅरो बेजेल्स आणि आय संरक्षणासह 1.5K फ्लॅट डिस्प्ले मिळेल असे समोर आले आहे.
- आगामी iQOO Neo 9 सीरीज चे फोन्स 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि 6,000mAh च्या मोठ्या बॅटरीने सुसज्ज असू शकतात.
- तुम्हाला सांगतो की फास्ट चार्जिंग शक्यतो 100W पेक्षा जास्त असू शकते. याचे कारण म्हणजे निओ 9 सीरीजमध्ये 120W तंत्रज्ञान आहे.
- टिपस्टरच्या मते स्नॅपड्रॅगन 8 जनरल 4 सह आगामी iQOO फोन Neo 10 सीरीजनंतर लाँच केला जाऊ शकतो.
iQOO Neo 10 सीरीज लाँच टाईमलाईन (अपेक्षित)
iQOO Neo 10 सीरीजबद्दल अशी अपेक्षा आहे की, ती या वर्षाच्या अखेरीस लाँच केली जाऊ शकते. गेल्या वर्षी iQOO Neo 9 लाईनअपमध्ये Neo 9 आणि 9 Pro यांसारखे दोन मॉडेल्स चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. तर, भारतात बेस मॉडेल प्रो मॉडेल नावाने लाँच केला गेला होता. तोच पॅटर्न यावेळीही पाळला जाऊ शकतो असे दिसत आहे.
iQOO Neo 9 Pro चे स्पेसिफिकेशन (भारत)
- डिस्प्ले: iQOO Neo 9 Pro मध्ये 6.78 इंचाचा 1.5K ॲमोलेड डिस्प्ले आहे. त्यावर 2800 x 1260 चे पिक्सेल रिझोल्यूशन आणि 3000 निट्स पीक ब्राईटनेस मिळत आहे.
- प्रोसेसर: iQOO Neo 9 Pro मध्ये परफॉर्मन्ससाठी क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट मिळत आहे. याचा क्लॉक स्पीड 3.2GHz पर्यंत आहे.
- स्टोरेज: फोनमध्ये 12GB रॅम आणि 256 GB पर्यंत स्टोरेज सपोर्ट मिळत आहे. यासोबत 12GB पर्यंत एक्सटेंडेड रॅम तंत्रज्ञान देण्यात आले आहे.
- कॅमेरा: iQOO Neo 9 Pro मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात OIS सह 50 मेगापिक्सेलची IMX 920 लेन्स आणि 8 मेगापिक्सेलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स मिळते. त्याचवेळी सेल्फीसाठी 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.
- बॅटरी: स्मार्टफोन चालवण्यासाठी 5160mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. त्याला चार्ज करण्यासाठी याला 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळत आहे.
