Home बातम्या iQOO Z1 5G स्मार्टफोन 144Hz डिस्प्ले आणि 8 जीबी रॅम सह झाला लॉन्च, करेल का Xiaomi ची सुट्टी

iQOO Z1 5G स्मार्टफोन 144Hz डिस्प्ले आणि 8 जीबी रॅम सह झाला लॉन्च, करेल का Xiaomi ची सुट्टी

iQOO गेल्या काही दिवसांपासून आपल्या लेटेस्ट Z सीरीज फोनच्या लॉन्च बद्दल टीज करत होती. आता ब्रँडने 5G सपोर्ट सह iQOO Z1 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा डिवाइस वेगवेगळ्या कलर ऑप्शन मध्ये चीन मध्ये उपलब्ध होईल, ज्यात स्पेस ब्लू आणि गॅलेक्सी सिल्वर यांचा समावेश आहे. कंपनीने आतापर्यंत डिवाइसच्या जागतिक लॉन्चची कोणतीही घोषणा केली नाही, पण iQOO Z1 लवकरच भारतात लॉन्च होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पण सध्यातरी याची ठोस माहिती मिळाली नाही. पुढे आम्ही तुम्हाला या फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती देते आहोत.

iQOO Z1 ची किंमत

iQOO Z1 5G चा 6GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेल कंपनीने RMB 2,198 (जवळपास 23,410 रुपये), 8GB रॅम + 128GB स्टोरेज मॉडेल RMB 2,498 (जवळपास 26,600 रुपये) आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज मॉडेल RMB 2,798 (जवळपास 29,800 रुपये) मध्ये सादर केला गेला आहे. डिवाइस स्पेस ब्लू आणि गॅलेक्सी सिल्वर कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.

स्पेसिफिकेशन्स

लेटेस्ट फ्लॅगशिप फोन iQOO Z1 बद्दल बोलायचे झाले तर यात 6.57-इंच एफएचडी+ डिस्प्ले देण्यात आलेला आहे जो 144Hz रिफ्रेश रेट सह येतो. तसेच यूजर्स कडे 60Hz आणि 90Hz डिस्प्ले निवडण्याचा पर्याय सेटिंग मध्ये असेल. 144Hz पॅनल यूजरना ओवरऑल एक्सपीरियंस चांगला देतो. याआधी Nubia ने जगातील पहिला 144Hz डिस्प्ले असलेला फोन Red Magic 5G फोन मार्च मध्ये सादर केला होता. आईक्यू झेड1 मध्ये मीडियाटेकचा लेटेस्ट चिपसेट डायमनसिटी 1000+ दिला गेला आहे, जो अलीकडेच लॉन्च केला गेला होता. या चिपसेट सहयेणारा हा पहिला फोन आहे. त्याचबरोबर डिवाइस तीन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे, ज्यात 6GB रॅम +128GB स्टोरेज, 8GB रॅम +128GB स्टोरेज आणि 8GB रॅम+256GB स्टोरेज मॉडेलचा समावेश आहे.

फोटोग्राफीसाठी iQOO 5G फोन मध्ये तुम्हाला मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअप मध्ये 48 मेगापिक्सलचा मेन कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा वाइड-अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे. डिवाइस 4K HD वीडियो शूटिंगला सपोर्ट करतो. डिवाइस मध्ये स्लो मोशन 1080P HD शूटिंग पर्यंत सपोर्ट करतो.

फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 44W अल्ट्रा-फास्ट फ्लॅश चार्जिंग टेक्निक सह येते. कंपनीचा दावा आहे कि आईक्यू चा हा नवीन फोन चार्जर द्वारे 23 मिनिटांत 50 टक्के चार्ज केला जाऊ शकतो. तसेच फोन सूपर लिक्यूड कूलिंग सिस्टमला सपोर्ट करतो. हँडसेट मध्ये 3.5mm हेडफोन जॅक, साइड-फेसिंग फिंगरप्रिंट रीडर आणि एनएफसी सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये डुअल स्टिरियो स्पीकर आणि स्मार्ट पीए डुअल-चॅनेल इंटेलिजेंट पावर एंपलिफायर देण्यात आलेला आहे.