आयकूने घोषणा केली आहे की ते भारतात आपला नवीन ‘झेड 9 एस’ सीरीज घेऊन येत आहे, तेव्हापासून हा स्मार्टफोन यूजरची वाट पाहत आहेत. तसेच आज कंपनीने अधिकृत स्तरावर सीरीजमध्ये सामिल होणाऱ्या मोबाईल फोनवरून पडदा उठविला आहे. ब्रँडकडून सांगण्यात आले आहे की ते iQOO Z9s Pro आणि iQOO Z9s 5G फोन भारतात लाँच करणार आहेत, तसेच ही सीरिज 4 ऑगस्टला लाँच केली जाईल.
iQOO Z9s Pro लवकरच होईल उपस्थित
4 ऑगस्टला आयकू बंगळुरू आणि कोयंबतूरमध्ये ‘स्नीक पिक‘ सेशनचे आयोजन करणार आहे ज्यात iQOO Z9s Pro प्रदर्शित केला जाईल. तसेच या दिवशी फोनचे फिचर्स व स्पेसिफिकेशन सांगितले जातील, आणि नंतर याच्या किंमतीची घोषणा केली जाईल. या कार्यक्रमामध्ये आयकू कम्युनिटी संबंधित लोक सहभागी होतील. तथापि, या सीरीजमध्ये iQOO Z9S 5G आणि Z9S Pro 5G फोन लाँच केले जातील याची पुष्टी झाली आहे.
The iQOO Z9s Series is coming to Coimbatore and Bengaluru on 4th August! Wanna lay your hands on the devices before anyone else? Now is your chance. Register Now for the Sneak Peek sessions and witness the magic unfold yourself! 📱🤩
Know More: https://t.co/Gna1ffHjoi
Register… pic.twitter.com/W44b6spOOR— iQOO India (@IqooInd) July 25, 2024
iQOO Z9s आणि Z9s Pro चा फोटो
फोटो पाहून माहिती मिळाली आहे की आयकू झेड 9 एस प्रो स्मार्टफोन दोन शेडमध्ये आणला जाईल. हा फोन ग्लास फिनिश तसेच विगेन लेदर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध होईल, ज्यात रिंग फ्लॅश लाईट पण दिली जाईल. या अंतर्गत आयकू झेड 9 एस 5 जी फोन ड्युअल रिअर कॅमेऱ्यावर लाँच केला जाईल जो 2x Portrait Zoom ला सपोर्ट करेल. या फोनमध्ये पण Aura Light मिळेल.
iQOO Z9s आणि Z9s Pro स्पेसिफिकेशन (लीक)
डिस्प्ले : लीकनुसार आयकू झेड 9 एस प्रो स्मार्टफोनला 6.78 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेवर लाँच केले जाऊ शकते. ही अॅमोलेड पॅनलवर बनलेली स्क्रीन असू शकते ज्यावर 120 हर्ट्स रिफ्रेश रेट मिळण्याची शक्यता आहे.
प्रोसेसर : iQOO Z9s Pro 5G फोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 7 जेन सीरीजच्या कोणत्याही चिपसेटवर लाँच केले जाऊ शकते. आशा करू शकता की कंपनी या फोनमध्ये हाय क्लॉक स्पीड असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर देईल. तसेच अँड्रॉईड 14 आधारित फनटच ओएस 14 मिळू शकतो.
मेमरी : नावावरून समजले आहे की हा ‘प्रो’ मॉडेल मोठ्या रॅमसह मार्केटमध्ये आणला जाईल. भारतीय बाजारात हा स्मार्टफोन 12GB RAM वर लाँच केला जाऊ शकतो ज्याच्याोबत 256GB इंटरनल स्टोरेज पाहायला मिळू शकते.
कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ट्रिपल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल ओआयएस सेन्सर दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर वाईड अँगल लेन्स तसेच मॅक्रो सेन्सर मिळण्याची शक्यता आहे.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी iQOO Z9s Pro 5G फोनमध्ये मोठी 5,500 एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते जो जास्त वेळाच्या हेल्थसह येईल. तसेच फोनमध्ये फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी पण असेल.
हे लक्षात घेण्यासारखे आहे की वरील तपशील केवळ लीक आणि अंदाजांच्या आधारावर दिले गेले आहेत. iQOO Z9s Pro 5G फोनच्या ठोस तपशीलांसाठी, आम्हाला कंपनीच्या घोषणेची प्रतीक्षा करावी लागेल.
