Home बातम्या 6000mAh Battery आणि 50MP Camera सह हा स्वस्त स्मार्टफोन झाला भारतात लाँच, किंमत फक्त 12999 रुपये

6000mAh Battery आणि 50MP Camera सह हा स्वस्त स्मार्टफोन झाला भारतात लाँच, किंमत फक्त 12999 रुपये

टेक ब्रँड आयकूने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन 5G Phone iQOO Z9x लाँच केला आहे. ‘झेड’ सीरीजमध्ये जोडला गेलेला हा लो बजेट मोबाईल फोन आहे, ज्याला फक्त 12,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 6,000mAh Battery, 50MP Camera आणि 16GB RAM(8+8) च्या ताकदीसह या नवीन आयकू मोबाईलची किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

iQOO Z9x किंमत

आयकू झेड 9 एक्स 5 जी फोन भारतात तीन रॅम व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे ज्यात 4 जीबी, 6 जीबी आणि 8 जीबी रॅम मिळते . याची किंमत क्रमश: 12999 रुपये, 14499 रुपये तसेच 15999 रुपये आहे. ICICI तसेच SBI वर 1000 रुपयांचा डिस्काऊंट तसेच फोनच्या 6GB आणि 8GB RAM व्हेरिएंटवर 500 रुपयांचे अ‍ॅमेझॉन डिस्काऊंट कूपन पण मिळेल. फोनला 21 मे पासून Tornado Green आणि Storm Grey कलरमध्ये विकत घेता येईल.

iQOO Z9x चे स्पेसिफिकेशन्स

स्क्रीन: iQOO Z9x 5G फोन 2408 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन 6.72 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच झाला आहे. पंच-होल स्टाईल असणारी ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे ज्यावर 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 1000 निट्स हाई ब्राईटनेस मिळतो.

प्रोसेसिंग: या मोबाईलला अँड्रॉईड 14 आधारित फनटच ओएस 14 वर सादर केले आहे जो क्वॉलकॉमच्या 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या स्नॅपड्रॅगन 6 जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसरवर चालतो. फोनमध्ये 2.2 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीड तसेच एड्रेनो 710 जीपीयू मिळतो.

मेमरी: भारतीय बाजारात आयकू झेड 9 एक्स 4 जीबी, 6 जीबी आणि 8 जीबी रॅमवर लाँच झाला आहे. फोनमध्ये 8 जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी पण आहे जो फिजिकल रॅमसह मिळून याला 16 जीबी पर्यंत वाढवतो. तसेच मोबाईलमध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 1 टीबी मेमरी कार्डला सपोर्ट देण्यात आला आहे.

कॅमेरा: फोटोग्राफीसाठी iQOO Z9x 5G ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल मेन सेन्सर देण्यात आला आहे जो एफ/2.4 अपर्चर असणाऱ्या 2 मेगापिक्सल बोका लेन्ससह मिळून चालतो. तसेच सेल्फी काढणे आणि रिल्स बनविण्यासाठी या फोनमध्ये एफ/2.05 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे

बॅटरी: पावर बॅकअपसाठी आयकू झेड 9 एक्स 5 जी फोन 6,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे.

इतर फिचर्स: iQOO Z9x 5G फोन आयपी 64 रेटिंगसह आला आहे. मोबाईलमध्ये 2+3 वर्षाचे अँड्रॉईड व सिक्योरिटी अपडेट मिळते. बेसिक कनेक्टिव्हिटी फिचर्स सोबत यात 3.5 एमएम जॅक व ड्युअल स्टीरियो स्पिकर्स दिले आहेत.