आयटेल काही आठवड्यांमध्ये आपल्या पी-सीरीजचा विस्तार करणार आहे. यानुसार नवीन itel P65 लाँच होण्याची शक्यता आहे. परंतु ब्रँडकडून अजून घोषणा करण्यात आलेली नाही, याआधी डिव्हाईस गुगलवर कंसोल, गीकबेंच, TUV आणि EEC सर्टिफिकेशन वेबसाईटवर स्पॉट झाला आहे. ज्यात प्रमुख स्पेसिफिकेशन समोर आले आहेत. तसेच स्मार्टफोनचे पूर्व मॉडेल प्रमाणे स्वस्त किंमतीत लाँच केले जाऊ शकते. चला, पुढे सर्व लिस्टिंगला सविस्तर जाणून घेऊया.
itel P65 गुगल प्ले कंसोल लिस्टिंग
- गुगल प्ले कंसोल लिस्टिंगमध्ये नवीन आयटेल मोबाईल मॉडेल नंबर P671L सह लिस्ट झाला आहे. तुम्ही खाली लिस्टिंगला फोटोमध्ये फोनचे नाव itel P65 दिसत आहे.
- हा Spreadtrum T615 SoC सह लिस्टेड आहे ज्यामुळे आता UNISOC T615 सांगितले जात आहे. त्याचबरोबर ARM Mali G57 GPU (850 MHz) असणार असल्याची माहिती मिळाली आहे.
- फोनमध्ये वरती सांगितलेल्या चिपसेटसह युजर्सना जवळपास 1.8 GHz पर्यंतचे क्लॉक स्पीड मिळू शकते.
- स्मार्टफोनमध्ये 4 जीबी रॅम मिळण्याची चर्चा आहे. तर लाँचच्या वेळी आणि पण मॉडेल येऊ शकतात.
- लिस्टिंगमध्ये डिव्हाईसची स्क्रीन रिजॉल्यूशन 720×1600 (480 DPI) सांगण्यात आली आहे.
- ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत itel P65 Android 14 वर काम करू शकतो.
itel P65 डिझाईन (गुगल प्ले कंसोल लिस्टिंग)
गुगल प्ले कंसोल लिस्टिंगमध्ये फोनचा एक फोटो पण आहे. ज्यात पंच-होल लेआऊट स्क्रीन दिसत आहे. मोबाईलच्या उजव्या साईडवर पावर बटन, वॉल्यूम रॉकर आणि एक अॅक्शन बटन असू शकते.
itel P65 गीकबेंच लॉस्टिंग
- गीकबेंच लिस्टिंग पाहता हे पण डिव्हाईस P671L मॉडेल नंबरसह स्पॉट झाला आहे.
- बेंचमार्किंग साईटवर आलेल्या माहितीवरून असे वाटत आहे की मोबाईलमध्ये परफॉरमेंससाठी Unisoc T615 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
- फोनमध्ये अँड्रॉईड 14 ऑपरेटिंग सिस्टम मिळणार असल्याची चर्चा आहे.
- itel P65 मध्ये कमीत कमी 4GB RAM दिले जाऊ शकते. परंतु मार्केट पॅटर्न पाहता व्हेरिएंट लाँच होऊ शकतो.
itel P65 टीयूवी आणि ईईसी लिस्टिंग
आयटेलचा नवीन मोबाईल समान मॉडेल नंबर P671L सह TUV आणि EEC वेबसाईटवर समोर आला आहे.
EEC साईटमध्ये मॉडेल नंबर आणि नाव दिसत आहे. तर टीयूवी साईटवरून समजले आहे की itel P65 मध्ये 4,900 mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
