आयटेलने आपल्या एस-सीरिजच्या नवीन मोबाईल itel S24 ला लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा 23 एप्रिलला भारतीय बाजारात येणार आहे. याची माहिती ई- कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनवर समोर आली आहे. विशेष म्हणजे फोनला भारतीय युजर्ससाठी ब्रँड फक्त 10 हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये घेऊन येणार आहे. तसेच फोनला लाँचच्या दिवशी खरेदी केल्यावर स्मार्टवॉच पण फ्री दिले जाईल. चला, पुढे आयटेल एस24 ची संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया.
itel S24 ची लाँचची तारीख आणि ऑफर्स
- कंपनीने ऑनलाईन शॉपिंग साईट अॅमेझॉनवर itel S24 ची लाँचची तारीख सांगितली आहे. हा फोन 23 एप्रिलला बाजारात येईल.
- डिव्हाईसच्या किंमतीबद्दल टिझरमध्ये कंफर्म झाले आहे की हा 10,000 पेक्षा कमी किंमतीत सेलसाठी उपलब्ध होईल.
- ऑफर अंतर्गत कंपनीने फक्त लाँचच्या दिवशी आयकॉन स्मार्ट वॉच फ्री देण्याचे वचन दिले आहे.
- हेच नाही तर डिव्हाईसचे फोटो आणि स्पेसिफिकेशन पण शेअर केले आहेत. ज्याची माहिती पुढे देण्यात आली आहे.
itel S24 चे स्पेसिफिकेशन
- टिझरमध्ये दिसले आहे की डिव्हाईस 90Hz रिफ्रेश रेट, 480nits ब्राइटनेस, सेंटर्ड पंच होल नॉच आणि डायनॅमिक बार नोटिफिकेशन सह 6.6-इंचाच्या डिस्प्लेसह असेल.
- कंपनीनुसार आयटेल S24 मीडियाटेक हेलियो जी91 प्रोसेसरसह सादर केला जाईल. तसेच डिव्हाईसने AnTuTu बेंचमार्क टेस्टमध्ये 260k अंक प्राप्त केले आहेत.
- स्टोरेजच्या बाबतीत डिव्हाईसमध्ये 128GB स्टोरेज आणि एक्सटेंटेड टेक्नॉलॉजीसह 16GB पर्यंत रॅम दिली जाईल.
- आयटेल S24 मध्ये कलर बदलणारा बॅक पॅनल आणि एक गोलाकार कॅमेरा मॉड्यूल असेल. यात ड्युअल-रिअर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात f/1.6 अपर्चर असलेला 108MP चा प्रायमरी सेन्सर दिला जाईल. या कॅमेऱ्यासह 3X झूम, सुपर नाईट मोड, AI पोट्रेट मोड, स्लो मोशन व्हिडिओ, ड्युअल व्यू व्हिडिओ सारखे अनेक ऑप्शन मिळतील.
- आयटेल एस 24 मध्ये 5000mAh ची बॅटरी आणि USB टाईप-C पोर्टवर 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळेल.
- फोनमध्ये डीटीएस ऑडियोला सपोर्टसह ड्युअल-स्पिकर सेटअप पण असेल.
