Categories: बातम्या

फक्त 3,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला शॅटरप्रूफ डिस्प्ले वाला आईवूमी वी5, जियो ग्राहकांना मिळेल अतिरिक्त 2,000 रुपयांचा डिस्काउंट

टेक कपंनी आईवूमी ने भारतीय स्मार्टफोन बाजारात अजून एक नवीन डिवाईस लॉन्च केला आहे. आईवूमी ने ‘वी5’ स्मार्टफोन बाजारात आणला आहे जो फक्त 3,499 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल. आईवूमी वी5 एक शॅटरप्रूफ स्मार्टफोन आहे आणि हा आॅनलाईन शॉपिंग साइट स्नॅपडील वरून एक्सक्लूसिव विकत घेता येईल.

आईवूमी वी5 ची सर्वात मोठी खासियत याचा शॅटरप्रूफ डिसप्ले आहे. हा डिस्प्ले आपल्या खास टेक्निक मुळे फोन पडल्यास किंवा आपटल्यावर याची स्क्रीन फुटत नाही तसेच याला तुटण्या पासून वाचवतो. आईवूमी वी5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 5-इंचाच्या एफडब्ल्यूवीजीए डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 7.0 नुगट आधारित आहे तसेच 1.2गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 1जीबी रॅम सह 8जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे, जी माइक्रोएसडी कार्ड ने वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता आईवूमी वी5 च्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 5-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी पण या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

आईवूमी वी5 बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,800एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. आईवूमी चा हा स्मार्टफोन शँपेन गोल्ड आणि झेड ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल. विशेष म्हणजे या स्मार्टफोन वर रिलायंस ​जियो पण 2,000 रुपयांचा कॅशबॅक देत आहे. या कॅशबॅक नंतर आईवूमी वी5 फक्त 1,299 रुपयांच्या प्रभावी किंमतीत घेतला जाऊ शकतो.

Published by
Siddhesh Jadhav