Nothing Phone 3 ची वाट पाहणाऱ्यांना मोठा धक्का! कंपनीने स्मार्टफोन लाँचशी संबंधित सांगितली ही मोठी गोष्ट

Nothing Phone या कंपनीने ट्रान्सपरंट बॅक पॅनेल असणारे फोन बाजारपेठेत आणल्याने खूप लोकांची मने जिंकली आहेत. आता या कंपनीचे अनोखे डिझाईन केलेले स्मार्टफोन युजर्सना खूप आवडले आहेत. हे लोक या ब्रँडच्या आगामी Nothing Phone (3) या स्मार्टफोनची आतुरतेने वाट पाहत आहेत. परंतु, नथिंगचे सह-संस्थापक आणि सीईओ कार्ल पेई यांनी Nothing Phone (3) बाबत एक मोठी घोषणा केली आहे, ज्यामुळे या फोनच्या चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

Nothing Phone (3) लॉन्च होणार नाही

कार्ल पेई यांनी सांगितले की, Nothing Phone (3) यावर्षी लाँच केला जाणार नाही. एका व्हिडिओमध्ये ब्रँडच्या यशाबद्दल आणि भविष्यातील नियोजनाबद्दल बोलताना कंपनीचे सीईओ कार्ल म्हणाले की, आपला नेक्स्ट जनरेशन Nothing Phone (3) हा मोबाईल फोन पुढील वर्षी 2025 मध्ये लॉन्च होईल. कार्ल पेई यांनी असेही सांगितले आहे की, नवीन Nothing Phone 3 मध्ये AI तंत्रज्ञान प्रदान केले जाईल आणि ते सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरच्या बाबतीत बरेच प्रगतशील असणार आहे.

Nothing Phone (3) परफॉर्मन्स

या लीक्समध्ये असा अंदाज लावला जात होता की, Nothing Phone (3) मध्ये 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला Snapdragon 8s Gen 3 प्रोसेसर असेल. जो 3 गिगाहर्ट्झ इतक्या क्लॉक स्पीडवर चालू शकेल. पण आता जेव्हा कंपनीने हे स्पष्ट केले आहे की 2025 मध्ये Nothing Phone (3) लाँच केला जाईल. त्यामुळे या मोबाईलमध्ये नवीन आणि प्रगत चिपसेट दिला जाण्याची शक्यता आहे जी अद्याप बनवली गेली नसावी. तर अंदाजे Nothing Phone (3) ची किंमत सुमारे 45 हजार रुपये असू शकते.

Nothing CMF Phone 1 (लीक माहिती)

  • 6.6″ 120 हर्ट्झ ओएलईडी डिस्प्ले
  • मीडियाटेक डाइमेंसिटी 7200
  • 8GB RAM + 256GB स्टोरेज
  • 50 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
  • 33 वॅट 5,000 एमएएच बॅटरी

किंमत: अशी चर्चा आहे की, नथिंग कंपनीकडून मध्यम बजेट असणारा Nothing CMF Phone 1 हा स्मार्टफोन 20,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लॉन्च केला जाऊ शकतो. लीकमध्ये फोनचा फोटो आणि स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत, जे इथे बघता येतील.

डिस्प्ले: मिळालेल्या माहितीनुसार, हा डिस्प्ले OLED पॅनलवर बनवला गेला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेटवर काम करेल. तसेच या मोबाईलमध्ये वॉटरड्रॉप नॉच असेल, हे या फोटोंमध्ये दिसत आहे.

प्रोसेसर: Nothing CMF Phone 1 हा Android 14 वर लॉन्च केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 4 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला MediaTek Dimensity 7200 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात येणार असल्याचे समोर येत आहे. तसेच यात 2.8 गिगाहर्ट्झ इतक्या क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता आहे.

स्टोरेज: Nothing CMF Phone 1 ला नथिंग कंपनीद्वारे दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, हा मोबाईल फोन 8 GB रॅमला सपोर्ट करेल ज्यात 128 GB स्टोरेज आणि 256 GB स्टोरेज उपलब्ध असेल. तर यामध्ये व्हर्च्युअल रॅम दिली जाईल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कॅमेरा: बऱ्याच काळानंतर सिंगल रियर कॅमेरा असलेला स्मार्टफोन लॉन्च होणार आहे. Nothing CMF Phone 1 च्या मागील पॅनलवर फक्त एक कॅमेरा सेंसर दिला जाईल, जो 50 मेगापिक्सेल असण्याची शक्यता आहे. तर यामध्ये 8 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे.

बॅटरी: मिळालेल्या माहितीनुसार, Nothing CMF Phone 1 मध्ये 5,000 एमएएच क्षमतेची बॅटरी असण्याची शक्यता आहे. तसेच या मोबाईलमध्ये बॅटरी जलद चार्ज करण्यासाठी 33W फास्ट चार्जिंगची सुविधा असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here