Jio पुन्हा एकदा आपल्या काही निवडक यूजर्सना मोफत अतिरिक्त डेटा देत आहे. 2GB रोज हाई स्पीड डेटा 5 दिवसांच्या वैधतेसह येतो. बोलले जात आहे कि कोरोनो वायरसमुळे सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये ग्राहकांसाठी जियोने हि ऑफर पुन्हा सादर केली आहे. कंपनीने एप्रिल मध्ये पण अशीच ऑफर दिली होती, ज्यात निवडक ग्राहकांना चार दिवसांच्या वैधता सह 2GB रोज मोफत डेटा दिला जात होता. कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.
Reliance Jio ने आपल्या या फ्री पॅकला ‘Jio Data Pack’ चे नाव दिले आहे. हा पॅक जियो उग्राहकांसाठी पूर्णपणे मोफत आहे. पॅक अंतर्गत Jio यूजर्सना रोज 2जीबी 4जी डेटा फ्री मध्ये दिला जात आहे. कोणत्याही रिचार्जविना यूजर्सच्या नंबर वर 2जीबी इंटरनेट डेटा क्रेडिट केला जात आहे. विशेष म्हणजे हा डेटा कंपनी द्वारे 5 दिवसांसाठी दिला जाईल. म्हणजे 5 दिवसांत जियो यूजर्सना एकूण 10जीबी इंटरनेट डेटा मिळेल.
Onlytech वेबसाइटच्या रिपोर्ट नुसार कंपनीने निवडक यूजर्सच्या अकाउंट मध्ये 2GB डेली ऍड ऑन डेटा पॅक क्रेडिट केले आहेत. या यूजर्सना हा डेटा 5 दिवसांच्या वैधतेसह मिळाला आहे. पण जेव्हा आम्ही आमच्या माय जियो ऍप मध्ये फ्री डेटाची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा अश्याप्रकारचा कोणताही फ्री डेटा मिळाला नव्हता.
असे बघा तुम्हाला फ्री डेटा मिळाला आहे का ते
तुम्हाला मोफत डेटा मिळाला आहे कि नाही हे बघण्यासाठी तुम्हाला My Jio App मध्ये ‘My Plans’ सेक्शन मध्ये जावे लागेल. इथे तुम्हाला डेटा पॅक टाइटलच्या खाली माहिती दिसेल. जर तुम्हाला अतिरिक्त डेटा मिळाला असेल तर करंट प्लान बेनेफिट्स सह एक्सट्रा डेटा दिसेल.
वर सांगितल्याप्रमाणे कंपनीने अधिकृतपणे याची कोणतीही माहिती दिली नाही. तसेच अजून स्पष्ट झाले नाही कि कोणत्या यजूर्सना फ्री डेटा ऑफर मिळत आहे. अनेक यूजर्सना कोणत्याही रँडम पद्दतीने हा डेटा मिळत आहे.
