दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने यावर्षीच्या सुरवातीला आपला एक रिपोर्ट प्रसिद्ध केला होता, ज्या नुसार भारतात 31 जानेवारी 2020 पर्यंत 115.6 कोटी मोबाईल यूजर्स होते. आता या करोडो यूजर्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. माहिती नुसार सर्व टेलिकॉम कंपन्यांचे रिचार्ज प्लान्स पुन्हा एकदा महाग होणार आहेत. प्लान्सच्या किंमतीत वाढ पुढल्या 12 ते 18 महिन्यांमध्ये दोनदा केली जाऊ शकते. अधिकृतपणे कोणत्याही कंपनीने याबाबत माहिती दिलेली नाही.
EY वेबासइटच्या माध्यमातून एक माहिती समोर आली आहे, ज्यात सांगण्यात आले आहे कि भारतातील सर्व टेलिकॉम कंपन्या आपले रिचार्ज प्लान्स महाग करणार आहेत. याआधी गेल्यावर्षी म्हणजे 2019 मध्ये 30 नोव्हेंबर नंतर रिलायंस जियो, एयरटेल, वोडाफोन-आइडिया आणि बीएसएनएल ने आपले रिचार्ज महाग केले होते.
गेल्यावर्षी टेलिकॉम इंडस्ट्री तोट्यातून वर यावी म्हणून टॅरिफ महाग करण्यात आले होते. तर यावेळी समोर आलेल्या माहितीनुसार कोरोना वायरस लॉकडाउन मध्ये कंपन्यांना आलेल्या अडचणींमुळे टॅरिफ प्लान्स महाग करण्याशिवाय कंपन्यांकडे पर्याय नाही.
EY मध्ये इमर्जिंग मार्केट्स टेक्नॉलजी, मीडिया अँड एंटरटेनमेंट अँड टेलिकम्युनिकेशंस (TMT) लीडर प्रशांत सिंघल यांनी माहिती देत सांगितले कि टॅरिफ महाग करणे आवश्यक आहे कारण टेलिकॉम ग्राहकांकडून केला जाणारा खर्च कमी आहे, त्यामुळे पुढल्या 6 महिन्यांत टॅरिफ महाग होतील. ते बोलले हे आवश्यक आहे आणि जितके लवकर होईल तेव्हढे चांगले आहे.
12 ते 18 महिन्यांत दोनदा टॅरिफ मध्ये वाढ
प्रशांत यांनी सांगितले कि पुढल्या 12 ते 18 महिन्यांत दोनदा टॅरिफ महाग होऊ शकतात. त्यांनी सांगितले आहे कि पुपुढ्ल्या सहा महिन्यांत एकदा कंपन्या आपले रिचार्ज महाग करतील आणि हे मार्केट मध्ये स्थिरता मिळवण्यासाठी आवश्यक आहे. टॅरिफ मध्ये यावेळी किती वाढ केली जाईल हे काही सांगता येत नाही.
