Home बातम्या 1 महिना चालतील Jio, Airtel आणि Vi चे हे स्वस्त प्लॅन, कॉलिंगसोबत मिळेल सुपर फास्ट डेटा

1 महिना चालतील Jio, Airtel आणि Vi चे हे स्वस्त प्लॅन, कॉलिंगसोबत मिळेल सुपर फास्ट डेटा

जवळजवळ सर्व टेलिकॉम कंपन्यांचे मासिक प्रीपेड प्लॅन्स 28 दिवसांच्या वैधतेसह येतात पण जर तुम्ही असा प्लान शोधत असाल ज्याची वैधता 28 नाही तर पूर्ण 1 महिन्यासाठी असेल, तर Airtel, Jio आणि Vodafone idea (Vi) कडे त्यांच्या ग्राहकांसाठी असे प्रीपेड प्लॅन्स देखील आहेत. वास्तविक, ट्रायने काही वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशानंतर सर्व कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांसाठी 1 महिन्याची वैधता असलेले प्लॅन लाँच केले होते. हे लक्षात घेऊन, आज आम्ही सर्व कंपन्यांच्या स्वस्त मासिक वैधता प्लॅन्सची यादी तयार केली आहे. या प्लॅन्स मध्ये तुम्हाला कोणते फायदे मिळतील ते पहा.

Jio चा 1 महिने चालणारा स्वस्त प्लॅन

             रिचार्ज प्लॅन               फायदे                वैधता
319 रुपये रोज 1.5 जीबी डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 एमएसएम 1 महिना

Airtel चा 1 महिना चालणारा स्वस्त प्लॅन

             रिचार्ज प्लॅन               फायदे                वैधता
379 रुपये रोज 2 जीबी डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 एमएसएम 1 महिना

Vi चा 1 महिना चालणारा स्वस्त प्लॅन

             रिचार्ज प्लॅन               फायदे                वैधता
218 रुपये एकूण 3 जीबी डाटा, अनलिमिटेड कॉलिंग, एकूण 300 एमएसएम 1 महिना

तुम्हाला सांगतो की, या प्लॅन्सला कॅलेंडर मंथ प्लॅन असे म्हणतात. हा प्लॅन अशा लोकांसाठी सर्वोत्तम पर्याय आहे, जे 28 आणि 30 दिवसांच्या प्लॅन्सला थकलेले आहेत. या 1 कॅलेंडर महिन्याच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 31 दिवसांसह संपूर्ण महिन्याची वैधता मिळते.