Home बातम्या Jio Fiber पोस्टपेड ग्राहकांसाठी आली दिवाळी धमाका ऑफर, मिळेल हा फायदा

Jio Fiber पोस्टपेड ग्राहकांसाठी आली दिवाळी धमाका ऑफर, मिळेल हा फायदा

टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओकडून खास दिवाळी धमाका ऑफर लाँच केली गेली आहे. तथापि, ही ऑफर कंपनीने फक्त जिओ फायबर पोस्टपेड ग्राहकांसाठीच सादर केली आहे. म्हणजेच त्याचे फायदे जर तुम्ही जिओ फायबर ब्रॉडबँड ग्राहक असाल तरच उचलू शकता. सोबतच तुम्हाला आठवण करून देतो की, कंपनीने याआधी सप्टेंबरमध्ये आपली वायरलेस ब्रॉडबँड सेवा जिओ एअरफायबर साठी रिलायन्स डिजिटल दिवाळी धमाका ऑफर सादर केली होती. तर, जिओ फायबर पोस्टपेड ग्राहकांसाठीच्या दिवाळी धमाका ऑफर बद्दल बोलायचे झाल्यास कंपनीने सांगितले आहे की या ऑफरसह डिस्काऊंट आणि ओटीटी फायदेही त्या ग्राहकांना मिळतील, ज्यांना नवीन जिओ फायबर पोस्टपेड कनेक्शन घ्यायचे असेल. चला पुढे तुम्हाला या ऑफरची संपूर्ण माहिती देत आहोत.

दिवाळी धमाका ऑफर

जिओ फायबर पोस्टपेड कनेक्शन घेणाऱ्या ग्राहकांना जसे की 6 महिने किंवा 12 महिन्यांचे प्लॅन्स घेण्याचा पर्याय दिला जातो. परंतु, नवीन दिवाळी धमाका ऑफरसह ते 3 महिन्यांची वैधता असणाऱ्या प्लॅन्समधून रिचार्ज करू शकतील. म्हणजेच त्यांच्यासाठी वायफाय लावणे आणखी स्वस्त होईल आणि विशेष ओटीटी फायदेही निश्चितपणे मिळतील. ग्राहक 100Mbps किंवा 30Mbps इंटरनेट स्पीड असलेले प्लॅन्स निवडू शकतात.

1. जिओ फायबरच्या 30Mbps प्लॅनची ऑफर: तीन महिन्यांसाठी जिओ फायबर पोस्टपेड प्लॅनचा खर्च 2,222 रुपये येईल. तर, या प्लॅनसोबत अमर्यादित डेटा 30Mbps च्या डाऊनलोड आणि अपलोड स्पीड सह दिला जाईल. सोबतच मोफत व्हॉईस कॉलिंग आणि 800 टीव्ही चॅनेल्सचे ॲक्सेस देखील मिळेल. इतकेच नाही तर या जिओ प्लॅनसह 101 रुपयांचा 100 जीबी अतिरिक्त डेटा 90 दिवसांसाठी मोफत दिला जात आहे. या प्लॅनमध्ये डिस्ने + हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी5, जिओ सिनेमा प्रीमियम, सन एनएक्सटी, होईचोई, डिस्कव्हरी+, अल्ट बालाजी, इरॉस नाऊ, लायन्सगेट प्ले, शेमारूमी, आणि ईटीव्ही विन, (via जिओटीव्ही+) च्या सब्सक्रिप्शनचा लाभ मिळेल.

2. जिओ फायबरचा 100Mbps प्लॅन: तुम्हाला 100Mbps हाय-स्पीड इंटरनेट हवे असल्यास दोन पोस्टपेड प्लॅन्सला नवीन ऑफरचा भाग बनवण्यात आले आहे आणि हे तीन महिन्यांच्या वैधतेसह येतात. पहिल्या प्लॅनची किंमत 3,333 रुपये आहे आणि तो अमर्यादित डेटा 100Mbps स्पीडसह ऑफर करतो. यामध्ये ही 800 टीव्ही चॅनेल्सचे ॲक्सेस मिळत आहे. या प्लॅनमध्ये 90 दिवसांच्या वैधतेसह 150 रुपये किमतीचा प्लॅन 150 जीबी डेटा मोफत देण्यात येत आहे. या प्लॅनसह डिस्ने + हॉटस्टार, सोनी लिव्ह, झी5, जिओ सिनेमा प्रीमियम, सन एनएक्सटी, होईचोई, डिस्कव्हरी+, अल्ट बालाजी, इरॉस नाऊ, लायन्सगेट प्ले, शेमारूमी, आणि ईटीव्ही विन, (via जिओटीव्ही+) चे सब्सक्रिप्शन मिळेल.

3. जिओ फायबरचा 100Mbps प्लॅन: या स्पीड सोबत कंपनीचा दुसरा पर्याय म्हणजे 4,444 रुपयांचा प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये अमर्यादित डेटा 100Mbps स्पीडसह मिळत आहे आणि 800 टीव्ही चॅनेल्सचे ॲक्सेस दिले जात आहे. तर, यामध्ये 199 रुपये किमतीचा 200 जीबी अतिरिक्त डेटा 90 दिवसांच्या वैधतेसह दिला जात आहे. हा प्लॅन देखील मागील रिचार्जप्रमाणेच ओटीटी चे फायदे देत आहे पण यासोबत तुम्हाला दोन वर्षांसाठी नेटफ्लिक्स बेसिक सबस्क्रिप्शन आणि ॲमेझॉन प्राईम लाईट सबस्क्रिप्शन अतिरिक्त मिळेल.