रिलायंस जियो आपली हाई-स्पीड फाइबर-टू-होम (FTTH) जियो गीगाफाइबर ऑफिशियली 12 ऑगस्टला लॉन्च करू शकतो. या लॉन्चची घोषणा कंपनी आपल्या वार्षिक जनरल मीटिंग (AGM) मध्ये करू शकते. पण रिलायंसने यावर्षीच्या AGM मध्ये काय होणार याची कोणतीही हिंट दिली नाही.
The Hindu च्या रिपोर्ट नुसार जियो या मीटिंग मध्ये गीगाफाइबर ब्रॉडबॅंड कमर्शियली लॉन्च करू शकते. GigaFiber सोबत रिलायंस Jio Home TV सेवा पण लॉन्च केले जाऊ शकतात.
रिलायंस जियोच्या ब्रॉडबँड सर्विस जियो गीगाफाइबर बद्दल बोलायचे तर हि एफटीटीएच म्हणजे फाइबर टू दी होम सर्विस आहे. जियोने हि सर्विस देशात सादर केली आहे पण अजून हि टेस्टिंग फेज मध्ये आहे. जियोच्या कर्मचाऱ्यांकडे जियो गीगाफाइबरचे कनेक्शन्स देण्यात आले आहेत ज्यात गीगाफाइबरचा स्पीड व क्षमता तपासली जात आहे.
Jio GigaFiber गेल्यावर्षीपासून चर्चेत आहे. एक वर्षापासून वेगवेगळ्या बातम्या समोर आल्या आहेत. आता असे वाटत आहे की सर्वांची प्रतीक्षा संपणार आहे. कंपनी आपल्या आगामी AGM मीटिंग मध्ये गीगाफाइबरची घोषणा ऑफिशियली करणार आहे.
आता पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार GigaFiber चा बेस प्लान Jio Triple Pay नावाने येऊ शकतो. यात सब्सक्राइबर्सना 600 रुपयांमध्ये 100जीबी पर्यंत कॉम्प्लिमेंटरी डेटा 50एमबीपीएस च्या स्पीड वर मिळेल. अजून एका प्लान मध्ये 1000 रुपयांमध्ये 100एमबीपीएस स्पीड मिळेल.
याव्यतिरिक्त गीगाटीव्हीच्या सेवेत सब्सक्रिप्शन पॅकेज मध्ये 600टीव्ही चॅनेल्स मिळू शकतात. हि फाइबर नेटवर्क टेक्नोलॉजी वर आधारित असेल. यात यूजर्सना हाई-डेफिनिशन टीव्ही व्यूइंग एक्सपीरियंस मिळेल.
