रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना भेट म्हणून एकाच वेळी अनेक आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन लाँच केले आहेत. या प्लॅनचा फायदा अशा लोकांना मिळेल जे वारंवार इतर देशांना भेट देतात आणि तिथे कॉल करण्यासाठी त्यांना नवीन प्लॅनची गरज असते. कंपनीने संयुक्त अरब अमिराती, कॅनडा, थायलंड आणि सौदी अरेबिया या देशांसाठी विशिष्ट प्लॅन्स आणले आहेत.
एवढेच नाही तर कंपनीने नवीन कंट्री स्पेसिफिक पॅकमध्ये कॅरिबियनमधील 24 देशांतील प्रसिद्ध स्थळांसाठी विशेष पॅक समाविष्ट केले आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की जिओ 32 युरोपियन देशांमधील सुप्रसिद्ध ठिकाणांसाठी विशेष पॅक प्रदान करत आहे. तसेच, नवीन कंट्री स्पेसिफिक पॅकमध्ये कॅरिबियन मधील 24 देशांमधील लोकप्रिय स्थळांसाठी विशेष पॅक समाविष्ट केले आहेत.
प्लॅनमध्ये मिळतील हे फायदे
यामध्ये अमर्यादित इनकमिंग एसएमएस, आऊटगोईंग कॉल्समध्ये भेट दिलेल्या देशातील स्थानिक कॉल्स आणि भारतात कॉल बॅक करणे समाविष्ट आहे. याशिवाय भारतात कॉल बॅकसाठी वाय-फाय कॉलिंगचाही वापर करता येईल. या प्लॅनमध्ये वाय-फाय कॉलिंगसह कोणत्याही देशातून इनकमिंग कॉल रिसिव्ह केला जाऊ शकतो. एवढेच नाही तर हा हाय-स्पीड डेटा आणि फेअर युजेस पॉलिसी (FUP) पेक्षा वेगळा आहे. म्हणजे रोजचा डेटा पॅक संपला तरी इंटरनेट फोन (अमर्यादित) चा वापर सुरूच राहील.
UAE ला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पॅक
- 898 रुपये – प्लॅन 100 मिनिटे आऊटगोईंग (स्थानिक + भारतात कॉल बॅक) + 100 मिनिटे इनकमिंग, 1जीबी डेटा आणि 100 एसएमएस 7 दिवसांसाठी मिळतात.
- 1598 रुपये – 150 मिनिटे आऊटगोईंग (स्थानिक + भारतात कॉल बॅक) + 150 मिनिटे इनकमिंग, 3जीबी डेटा आणि 14 दिवसांसाठी 100 एसएमएस मिळत आहेत.
- 2998 रुपये – 100 मिनिटे आऊटगोईंग (स्थानिक + भारतात कॉल बॅक) + 250 मिनिटे इनकमिंग, 7जीबी डेटा आणि 100 एसएमएस 21 दिवसांसाठी मिळतात.
थायलंड मध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी पॅक
1551 रुपयांच्या प्लॅनमध्ये 100 मिनिटे आऊटगोईंग आणि 100 इनकमिंग कॉलचे फायदे मिळतात. यात 6 जीबी डेटा आणि 50 एसएमएस देखील मिळतील. त्याचवेळी, त्याची वैधता 14 दिवसांची आहे.
याशिवाय, जिओच्या 2851 रुपयांच्या दुसऱ्या प्लॅनमध्ये 150 मिनिटे आऊटगोईंग आणि 150 मिनिटे इनकमिंग, 100 एसएमएस आणि 12 जीबी डेटा दिला जात आहे. त्याची वैधता 30 दिवसांची आहे.
कॅनडाला भेट देणाऱ्या प्रवाशांसाठी पॅक
प्लॅनची किंमत 1691 रुपये आहे आणि यात 5 जीबी डेटा, 50 एसएमएस आणि 14 दिवसांची वैधता दिली जात आहे. त्याचवेळी, 100 मिनिटे इनकमिंग आणि आऊटगोईंगसाठी कॉलिंगची सुविधा आहे.
याशिवाय 2881 रुपयांच्या प्लॅनमध्ये 150 मिनिटे इनकमिंग आणि 150 मिनिटे आऊटगोईंग, 30 दिवसांसाठी 10 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळत आहेत.
युरोपला भेट देणाऱ्यांसाठी प्लॅन
युरोपातील 32 देशांसाठी खास रोमिंग प्लॅन सुरू करण्यात आला आहे. कंपनीने युरोपियन देशांसाठी 2899 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. जिओच्या या प्लॅन मध्ये 30 दिवसांची वैधता मिळत आहे. यामध्ये 100 मिनिटे आऊटगोईंग आणि 100 मिनिटे इनकमिंग कॉलचा लाभ मिळेल. याशिवाय अमर्यादित मोफत इनकमिंग एसएमएस, 100 आऊटगोईंग एसएमएस आणि 5 जीबी डेटाचा लाभ दिला जात आहे.
सौदी अरेबियाला भेट देणाऱ्यांसाठी प्लॅन
जिओने सौदी अरेबियासाठी तीन खास रोमिंग प्लॅन आणले आहेत. जिओचे हे प्लॅन 891 रुपये, 1291 रुपये आणि 2891 रुपयांचे असे तीन प्लॅन आहेत. 891 रुपयांच्या प्लॅनमध्ये 7 दिवसांची वैधता मिळत आहे. यामध्ये 100 मिनिटे आऊटगोईंग आणि 100 मिनिटे इनकमिंग कॉलचा लाभ मिळेल. त्याचवेळी, यात अमर्यादित विनामूल्य इनकमिंग एसएमएस, 20 आऊटगोईंग एसएमएस आणि 1जीबी डेटाचा लाभ मिळेल.
दुसरीकडे, 1291 रुपयांच्या प्लॅनमध्ये 14 दिवसांची वैधता मिळत आहे. यामध्ये 100 मिनिटे आऊटगोईंग आणि 100 मिनिटे इनकमिंग कॉलचा लाभ मिळेल. सोबतच अमर्यादित मोफत इनकमिंग एसएमएस, 50 आऊटगोईंग एसएमएस आणि 2जीबी डेटा देखील मिळेल.
2891 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 30 दिवसांची वैधता मिळते. यामध्ये 150 मिनिटे आऊटगोईंग आणि 150 मिनिटे इनकमिंग कॉलचा लाभ मिळेल. यामध्ये 5जीबी डेटा आणि 100 आऊटगोईंग एसएमएस ऑफर केले जात आहेत. या प्लॅनमध्ये देखील ग्राहकांना अमर्यादित मोफत इनकमिंग एसएमएसचा लाभ मिळेल.
