Home बातम्या 717GB डेटा आणि फ्री कॉलिंग सह Jio ने आणेल तीन नवीन ‘ऑल-इन-वन’ प्लान्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती

717GB डेटा आणि फ्री कॉलिंग सह Jio ने आणेल तीन नवीन ‘ऑल-इन-वन’ प्लान्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती

भारतीय टेलीकॉम सेक्टर मध्ये वाढती स्पर्धा पाहून सर्व कंपन्या आपले नवीन आणि शानदार प्लान्सने युजर्सना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतात टॉप पोजिशन वर असलेल्या रिलायंस जियोने आता आपल्या प्रीपेड युजर्ससाठी तीन नवीन शानदार प्लान सादर केले आहेत. हे प्लान्स JioPhone युजर्ससाठी सादर केले गेले आहेत. कंपनीने हे ऑल-इन-वन ऍन्युअल प्लान्सच्या कॅटेगरी मध्ये समाविष्ट केले आहेत. तिन्ही नवीन प्लान्स मध्ये 336 दिवसांची वॅलिडिटी मिळते. पण यात वेगवेगळे डेटा आणि बेनिफिट्स दिले जात आहेत.

जियोचा 1001 रुपयांचा ऑल-इन-वन प्लान

रिलायंस जियोच्या या प्लान मध्ये 49 जीबी हाई-स्पीड डेटा मिळतो. हा डेटा 336 दिवसांसाठी वैध असेल. म्हणजे युजर्सना रोज 150 एमबी डेटा मिळेल. डेटा व्यतिरिक्त या प्लान मध्ये युजर्सना 100 एसएमएस आणि जियो ते जियो वर अनलिमिटेड कॉलिंग दिली जात आहे. दुसऱ्या नेटवर्क्स वर कॉलिंगसाठी 12000 मिनिट्स मिळतील.

हे देखील वाचा : Jio आणि Airtel च्या आधी आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवण्यास तयार आहे Vi, जाणून घ्या किती भारी पडेल रिचार्ज करणे

जियोचा 1301 रुपयांचा ऑल-इन-वन प्लान

1301 रुपयांच्या ऑल-इन-वन प्लान मध्ये JioPhone युजर्सना एकूण 164 जीबी डेटा मिळेल. इतकेच नव्हे तर युजर्सना या प्लान मध्ये हाई-स्पीड 500 एमबी डेटा दिला जात आहे. 1001 रुपयांचा प्लान प्रमाणेच या प्लान मध्ये पण युजर्सना 336 दिवसांची वॅलिडिटी आणि 100 फ्री एसएमएस, अनलिमिटेड जियो ते जियो कॉलिंगचा लाभ मिळेल. तसेच दुसऱ्या नेटवर्क्स वर कॉलिंगसाठी 12000 मिनट्स मिळतील. प्लान जियो ऍप्सचे कॉम्प्लिमेंटरी सब्सक्रिप्शन पण ऑफर करतो.

हे देखील वाचा : Reliance Jio ने लॉन्च केला ‘Made in India’ वेब ब्राउजर JioPages, बघा याचे 5 खास फीचर्स

जियोचा 1501 रुपयांचा ऑल-इन-वन प्लान

कंपनीद्वारे सादर केल्या गेलेल्या या तिन्ही प्लान पैकी हा प्लान सर्वात महाग आहे. या प्लान मध्ये रोज 1.5 जीबी डेटा मिळतो आणि 336 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. तसेच प्लान मध्ये एकूण 504 जीबी डेटा मिळेल. युजर्सना 100 फ्री एसएमएस पण दिले जात आहेत. जियो ते जियो नेटवर्क वर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग व्यतिरिक्त दुसऱ्या नेटवर्क्स वर कॉलिंगसाठी 12,000 मिनिट्स मिळतात.