Home बातम्या आता विमानात 30 हजार फूट उंचीवरून पण करता येईल Jio सिमने कॉल, एयरलाईन्सची केली भागीदारी

आता विमानात 30 हजार फूट उंचीवरून पण करता येईल Jio सिमने कॉल, एयरलाईन्सची केली भागीदारी

भारतातील नंबर वन टेलीकॉम सर्विस प्रोवाइडर रिलायंस जियो आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच नव-नवीन प्लान सादर करत असते. कंपनीने अलीकडेच आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी पाच नवीन प्लान सादर केले होते. तर आता Jio ने इन-फ्लाइट कनेक्टिविटी पॅक्स लॉन्च केले आहेत. नवीन शृंखलेत तीन वेगवेगळे इन-फ्लाइट कनेक्टिविटी पॅक आहेत. या पॅक्सचा वापर फक्त त्या 22 एयरलाइन्स मध्ये करता येईल ज्यांच्यासोबत कंपनीने पार्टनरशिप केली आहे.

प्लान्सची किंमत

Reliance Jio ने सादर केल्या तीन इन-फ्लाइट पॅक्सची किंमत 499 रुपये, 699 रुपये आणि 999 रुपये आहे. तसेच या तिन्ही प्लानची वॅलिडिटी एक दिवस आहे. जियोच्या वेबसाइट नुसार डेटा आणि एसएमएस सर्विस सर्व एयरलाइन्स मध्ये उपलब्ध आहे. पण कॉलिंग सर्विस फक्त निवडक एयरलाइन्स मध्ये दिली जात आहे.

499 रुपये, 699 रुपये आणि 999 रुपयांचा इन-फ्लाइट प्लान

एक दिवसाच्या वॅलिडिटी सह येणाऱ्या या तिन्ही प्लान मध्ये कॉलिंगसाठी 100 मिनट्स आणि 100 एसएमएस मिळतात. पण तिन्ही प्लान मध्ये इनकमिंग कॉल्सची सुविधा मिळणार नाही. 499 रुपयांच्या प्लान मध्ये 250MB डेटा आणि 699 रुपयांच्या प्लान मध्ये 500MB डेटा मिळतो. तर 999 रुपयांच्या प्लान मध्ये 1GB डेटा मिळतो. या प्लान्सचा फायदा कोणत्या एयरलाइन्स मध्ये घेता येईल, याची माहिती कंपनीच्या वेबसाइट jio.com च्या International Roaming सेक्शन मध्ये देण्यात आली आहे.

इन फ्लाइट कॉल आणि डेटाचा वापर

Jio इन-फ्लाईट कनेक्टिविटी पॅकसाठी पार्टनरशिप एयरलाईन्सच्या यादीत Aer Lingus, Cathay Pacific, Egypt Air, EVA Air, Lufthansa, Singapore Airlines, TAP Air Portugal आणि Turkey Airlines चा समावेश आहे जे आपल्या फ्लाईट मध्ये डेटा आणि एसएमएस ऍक्सेस देतात. पण Air Serbia, Alitalia, Asiana Airlines, Biman Bangladesh Airlines, Emirates, Etihad Airways, Euro wings, Kuwait Airways, Malaysia Airlines, Malindo Air , SAS Scandinavian Airlines, SWISS, Uzbekistan Airways, आणि Virgin Atlantic मध्ये इन-फ्लाइट कनेक्टिविटी पॅकची सेवा मिळेल.