Home बातम्या Jio ने पण सादर केले नवीन प्लान्स, बघा Airtel Vodafone पेक्षा आहेत किती स्वस्त

Jio ने पण सादर केले नवीन प्लान्स, बघा Airtel Vodafone पेक्षा आहेत किती स्वस्त

मोबाईल फोन वर बोलणे आधीपेक्षा महाग झाले आहे. वोडाफोन-आइडिया आणि एयरटेल नंतर टेलीकॉम क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी जियोने पण आपले टॅरिफ वाढवले आहेत. कंपनीने JIO “NEW ALL-IN-ONE” प्लान्स सादर केले आहेत जे 6 डिसेंबर पासून लागू होतील. जियो कस्टमर्स 6 डिसेंबर आधी जुने प्लान वापरू शकता.

रिलायंस जियोच्या 34.8 कोटी ग्राहकांकडे 5 डिसेंबर म्हणजे आजचा दिवस आहे. म्हणजे एका दिवसात ग्राहक जुन्या दराने रिचार्ज करू शकतात. इतर सर्व कंपन्यांचे प्लान्सचे नवीन दर 3 डिसेंबर पासून लागू झाले आहेत. अंदाज खरे ठरले जियो आपल्या ग्राहकांना 300 टक्क्यांपेक्षा जास्त फायदे देत आहे.

जियोने आपले नवीन प्लान्स वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये सादर केले आहेत. कंपनीने नवीन सादर केलेले JIO “NEW ALL-IN-ONE” प्लान्स 1-month, 2-month, 3-month, 12-month आणि ऑफोर्डेबल प्लान्सच्या कॅटेगरी मध्ये सादर करण्यात आले आहेत. या सर्व प्लान्स सह यूजर्सना अनेक बेनिफिट्स पण मिळतील. चला पुढे सर्व प्लान्सबद्दल सविस्तर बघूया.

1 महिना वैधता असलेले प्लान्स

कंपनीने एक महिना वैधता असलेल्या प्लानच्या कॅटेगरी मध्ये तीन टॅरिफ सादर केले आहेत. या कॅटेगरी मध्ये 199 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना 1.5जीबी डेटा प्रति दिन, 249 रुपयांच्या प्लान मध्ये 2जीबी डेटा प्रति दिन आणि 349 रुपयांच्या प्लान मध्ये 3जीबी डेटा प्रतिदिन मिळेल. तसेच या तिन्ही प्लान मध्ये यूजर्सना जियो टू जियो नेटवर्क वर अनलिमिटेड फ्री कॉलिंग सह 1000 मिनिट्स IUC कॉलिंग मिळेल जी यूजर्स दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंगसाठी वापरू शकतील. तसेच या तिन्ही प्लान मध्ये 28 दिवसांची वैधता मिळेल.

2 महिना वैधता असलेले प्लान्स

एक महिना वैधतेच्या प्लान पेक्षा वेगळे कंपनीने 2 महिना कॅटेगरी मध्ये दोन नवीन प्लान्स सादर केले आहेत. या कॅटेगरी मध्ये 399 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना 1.5जीबी डेटा प्रति दिन आणि 444 रुपयांच्या प्लान मध्ये 2जीबी डेटा प्रति दिन मिळेल. तसेच या दोन्ही प्लान मध्ये यूजर्सना जियो टू जियो नेटवर्क वर अनलिमिटेड फ्री कॉलिंग सह 2000 मिनिट्स IUC कॉलिंग मिळेल जी यूजर्स दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंगसाठी वापरू शकतील. तसेच या तिन्ही प्लान मध्ये 56 दिवसांची वैधता मिळेल.

3 महिना वैधता असलेले प्लान्स

कंपनीने 2 महिन्यांच्या कॅटेगरी प्रमाणे 3 माह कॅटेगरी मध्ये दोन नवीन प्लान्स सादर केले आहेत. या कॅटेगरी मध्ये 555 रुपयांच्या प्लान मध्ये यूजर्सना 1.5जीबी डेटा प्रति दिन आणि 599 रुपयांच्या प्लान मध्ये 2जीबी डेटा प्रति दिन मिळेल. त्याचबरोबर या दोन्ही प्लान मध्ये यूजर्सना जियो टू जियो नेटवर्क वर अनलिमिटेड फ्री कॉलिंग सह 3000 मिनिट्स IUC कॉलिंग मिळेल जी यूजर्स दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंगसाठी वापरू शकतील. तसेच या तिन्ही प्लान मध्ये 84 दिवसांची वैधता मिळेल.

12 महिना वैधता असलेले प्लान्स

12 महिन्यांच्या कॅटेगरी मध्ये कंपनीने 2199 रुपयांचा प्लान सादर केला आहे. यात यूजर्सना 1.5जीबी डेटा प्रति दिन मिळेल. तसेच या प्लान मध्ये यूजर्सना जियो टू जियो नेटवर्क वर अनलिमिटेड फ्री कॉलिंग सह 1200 मिनिट्स IUC कॉलिंग मिळेल जी यूजर्स दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंगसाठी वापरू शकतील. यात 365 दिवसांची वैधता मिळेल.

अफोर्डेबल प्लान

या कॅटेगरी मध्ये कंपनीने 129 रुपये, 329 रुपये आणि 1,299 रुपयांचा प्लान सादर केला आहे. यूजर्सना 129 रुपयांच्या प्लान मध्ये 28 दिवसांच्या वैधतेसह 2जीबी डेटा आणि 1000 IUC कॉलिंग मिनिट्स मिळतील. 329 रुपयांच्या प्लान मध्ये 84 दिवसांच्या वैधतेसह 6जीबी डेटा मिळेल. तसेच यात 3000 IUC कॉलिंग मिनिट्स मिळतील. 1,299 रुपयांच्या प्लान बद्दल बोलायचे तर यात यूजर्सना 365 दिवसांच्या वैधतेसाठी 24जीबी डेटा मिळेल. तसेच या लॉन्ग टर्म असलेल्या प्लान मध्ये 1,200 IUC मिनिट्स मिळतील.

मिळतील हे फायदे

1. JioTV वर 600+ TV चॅनेल, ज्यात 100+ HD चॅनेल मिळतील.

2. JioCinema – 10,000+ चित्रपट आणि Disney, Marvel, Pixar, Lucas, Voot, ErosNow, Alt Balaji, Paramount, SunNxt आणि अनेक कंटेंट पार्टनरचा कंटेंट ऍक्सेस मिळेल.

3. JioSaavn – 5+ कोटी गाणी आणि फ्री कॉलर ट्यूनचा ऍक्सेस.

4. JioNews – 150+ लाइव न्यूज चॅनेल, 300+ न्यूजपेपर एडिशन, 800+ मॅगजीन.

5. JioSecurity – Norton’s प्रीमियम मोबिलिटी सिक्योरिटी सूटचा ऍक्सेस.

6. JioCloud – 5 GB क्लाउड स्टोरेजचा ऍक्सेस.

7. JioHealthHub – टेस्ट बुक, डॉक्टरांकडून सल्ला, वजनाबद्दल सल्ला.