Reliance Jio आपल्या ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत असते. यासाठी कंपनी कमी किंमतीत जास्त बेनिफिट्स देणारे नवीन प्लॅन सादर करत असते, असाच एक नवीन प्लॅन जियोच्या वेबसाइट आणि माय जियो अॅपमध्ये लिस्ट झाला आहे. देशातील सर्वात मोठ्या टेलीकॉम कंपनीनं आपल्या प्रीपेड युजर्ससाठी एक नवीन डेटा पॅक सादर केला आहे, ज्यात डेटा सोबतच 30 दिवसांची वैधता दिली जात आहे. कंपनीनं या प्लॅनला ‘फुटबॉल वर्ल्ड कप डेटा पॅक’ असं नाव दिलं आहे. त्यामुळे असं वाटत आहे की हा प्लॅन फक्त फुटबॉल वर्ल्ड कपपर्यंत उपलब्ध असेल, त्यानंतर हा प्लॅन बंद होईल. नवीन जियो प्लॅनची किंमत 222 रुपये ठेवण्यात आली आहे. आइए जानते आहेत इस प्लॅनबाबत सर्वकाही.
Reliance Jio 222 Prepaid Plan
Jio च्या नव्या 222 रुपयांच्या प्रीपडे प्लॅन बद्दल बोलायचं झालं तर कंपनीनं याचं ‘फुटबॉल वर्ल्ड कप डेटा पॅक’ असं ठेवलं आहे. त्यामुळे नावावरून तुम्हाला समजलं असेल की हा खास फुटबॉल वर्ल्ड कपसाठी आलेला डेटा रिचार्ज प्लॅन आहे. हा रिचार्ज प्लॅन कंपनीच्या साइट सोबतच MyJIO App वर देखील लिस्ट करण्यात आला आहे. हा प्लॅन 4G डेटा पॅकच्या लिस्टमध्ये तुम्हाला सहज सापडेटल. ग्राहक हा रिचार्ज करण्यासाठी रिटेल स्टोरवर देखील जाऊ शकतात. तसेच जियो मोबाइल अॅपद्वारे देखील रिचार्ज करता येईल. हे देखील वाचा: 6000mAh च्या बॅटरीसह स्वस्त Tecno Pova 4 ची भारतात एंट्री; 13GB रॅमसह 50MP चा शानदार कॅमेरा
Jio च्या 222 रुपयांच्या या नव्या रिचार्ज प्लॅनमध्ये 28 नव्हे तर 30 दिवसांची वैधता मिळते. हा डेटा पॅक असल्यामुळे यात इतर कोणतेही फायदे मिळत नाहीत, तर या रिचार्जमध्ये युजरला फक्त 50GB डेटा मिळेल. 50GB डेटा संपल्यावर स्पीड कमी होऊन 64 Kbps होईल. हा प्लॅन खासकरून त्या लोकांसाठी आहे, जे फुटबॉल वर्ल्डकप बघण्यासाठी मोबाइल डेटा वापरत आहेत. इंटरनेटचा जास्त वापर करणारे युजर देखील या प्लॅनचा वापर करू शकतात.
30 दिवसांचे जियो डेटा पॅक
- Rs 181 data add-on pack: 181 रुपयांच्या डेटा अॅड-ऑन पॅकमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह एकूण 30GB डेटा मिळतो. पॅकमधील डेटा पूर्णपणे संपल्यास, इंटरनेटचा स्पीड 64 केबीपीएस पर्यंत कमी होतो.
- Rs 241 data add-on pack: हा प्लॅन 30 दिवसांच्या वैधतेसाठी 40GB हाय-स्पीड 4G डेटा देतो. तसेच या प्लॅनमध्ये देखील डेटा संपल्यावर स्पीड कमी होऊन फक्त 64Kbps होतो.
- Rs 301 data add-on pack: 301 रुपयांच्या डेटा अॅड-ऑन पॅकमध्ये तुम्हाला 50 जीबी 4जी इंटरनेट डेटा मिळतो ज्याचा वापर तुम्ही पुढील 30 दिवसांमध्ये करू शकता. अन्य अॅड-ऑन पॅक प्रमाणे, एकदा निर्धारित डेटा संपला की इंटरनेट स्पीड कमी होऊन 64Kbps वर येतो.
