Home बातम्या Jio ची मोफत सेवा बंद, कॉलिंगसाठी द्यावे लागतील पैसे

Jio ची मोफत सेवा बंद, कॉलिंगसाठी द्यावे लागतील पैसे

रिलायंस जियोने आपल्या 35 कोटी ग्राहकांना दिवाळीच्या आधी मोठा झटका देत घोषणा केली आहे कि जियो यूजर्सना आता दुसऱ्या नेटवर्क वर कॉलिंग करण्यासाठी पैसे द्यावे लागतील. या घोषणेनंतर जियो यूजर्सना अडचण येऊ शकते. आपल्या मोफत सेवेमुळे ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली जियो आता ग्राहकांकडून दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्क वर कॉल करण्यासाठी प्रति मिनट 6 पैसे घेईल.

जियो नेटवर्क वर कॉलिंग असेल फ्री

या नवीन घोषणेचा अर्थ असा आहे कि जियोच्या ग्राहकांना आता फोन वर बोलण्यासाठी पैसे द्यावे लागतील. पण जियोच्या विधानानुसार जियो वरून जियो नेटवर्क वर कॉलिंग अधिप्रमाणे फ्री असेल.

जियो यूजर्सना द्यावे लागतील 6 पैसे प्रति मिनट

आज पासून जियो ग्राहकांकडून सर्व रीचार्ज वर आईयूसी टॉप-अप वाउचरच्या माध्यमातून 6 पैसे प्रति मिनिटांच्या आईयूसी दराने चार्ज घेतला जाईल. जोपर्यंत TRAI झिरो टर्मिनेशन चार्ज लागू करत नाही तोपर्यंत हा चार्ज घेतला जाईल. याचा अर्थ असा कि आता जियो यूजर्सना एयरटेल, वोडाफोन किंवा इतर नेटवर्क वर कॉल केल्यास 6 पैसे प्रति मिनट द्यावे लागतील.

इंटरकनेक्ट यूसेज चार्ज म्हणजे काय

इंटरकनेक्ट यूसेज चार्ज (IUC) एका मोबाईल टेलिकॉम ऑपरेटर द्वारे दुसऱ्याला द्यावी लागणारी किंमत आहे. जेव्हा एका टेलीकॉम ऑपरेटरचा ग्राहक दुसऱ्या ऑपरेटरच्या ग्राहकांना आउटगोइंग मोबाईल कॉल करतो तेव्हा IUC कॉल करणाऱ्या ऑपरेटरला द्यावी लागते. दोन वेगवेगळ्या नेटवर्क मध्ये होणार कॉल मोबाईल ऑफ-नेट कॉल असतो. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) IUC शुल्क निर्धारित करते आणि सध्यातरी हे 6 पैसे प्रति मिनट आहे.

मोबाईल कॉल वर 6 पैसे प्रति मिनट शुल्क तोपर्यंत असेल जोपर्यंत TRAI आपल्या रेगुलेशन मध्ये बदल करत नाही. कंपनीने 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतचे प्लान सादर केले आहेत.

इतर कंपन्यांच्या नेटवर्क वर कॉलिंग साठी जियोने 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतचे टॉप अप वाउचर पण जारी केले आहेत. 10 रुपयांच्या प्लान मध्ये इतर नंबरवर 124 मिनिटे कॉलिंग करता येईल. तसेच 20 रुपयांच्या प्लान मध्ये 249 मिनिटे, 50 रुपयांच्या प्लान मध्ये 656 मिनिटे आणि 100 रुपयांच्या प्लान मध्ये 1,362 मिनिटे कॉलिंग मिळेल.

टॉप वाउचरच्या बदल्यात मिळेल मोफत डेटा

जियो आपल्या ग्राहकांना टॉप वाउचरच्या मोबदल्यात फ्री डेटा देणार आहे. 10 रुपयांच्या प्लानसह 1 जीबी डेटा, 20 रुपयांसह 2 जीबी डेटा, 50 रुपयांसह 5 जीबी डेटा आणि 100 रुपयांच्या प्लानसह 10 जीबी डेटा दिला जाईल.

टॅरिफ मध्ये बदल होणार नाही

कंपनीने स्पष्ट केले आहे कि ते आपल्या प्लानच्या किंमत बदलणार नाहीत किंवा वाढवणार नाहीत. तसेच जर तुमच्याकडे जियोचा पोस्टपेड नंबर असेल तर IUC चार्ज तुमच्या बिल मध्ये सामील होईल. तर प्रीपेड ग्राहकांकडे टॉप-अप वाउचरचा ऑप्शन असेल.