रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्मार्ट टीव्हीसाठी JioTV+ ॲप लाँच केले आहे. हे आधी केवळ जिओ सेट-टॉप बॉक्स (STB) द्वारे उपलब्ध होते. त्याचवेळी तुम्हाला सांगतो की हे ॲप Jio Air Fiber किंवा JioFiber कनेक्शन सोबत बंडलमध्ये येत होते. या ॲपच्या वैशिष्ट्याबद्दल सांगायचे तर यात 10 हून अधिक भाषांमध्ये 800 हून अधिक डिजिटल चॅनेल्सचे ॲक्सेस मिळते. यासोबतच वापरकर्ते एकाच लॉगिनद्वारे 13 पेक्षा जास्त ओटीटी ॲप्सचे ॲक्सेस घेऊ शकतात. चला पुढे आम्ही तुम्हाला JioTV+ ॲपबद्दल माहिती देऊ.
JioTV+ ॲपची उपलब्धता आणि इतर तपशील
JioTV+ ॲप आता अँड्रॉईड टीव्ही, ॲपल टीव्ही आणि ॲमेझॉन फायर ओएस-चालित टीव्हीवर उपलब्ध असेल.
JioTV+ ॲप भारतातील सर्वात मोठे कॅन्टेट एग्रीगेटर प्लॅटफॉर्म म्हणून वेगाने उदयास येत आहे. JioTV+ जे आतापर्यंत फक्त JioSTB द्वारे उपलब्ध होते. हे ॲप आता सर्व प्रमुख स्मार्ट टीव्ही ओएस वर मोफत डाऊनलोडसाठी उपलब्ध असेल.
JioTV+ मध्ये ॲप 10 पेक्षा अधिक भाषा आणि 20 हुन अधिक शैलींतील 800 पेक्षा जास्त डिजिटल टीव्ही चॅनेल्स दिसतात. याव्यतिरिक्त वापरकर्ते एकाच लॉगिनसह 13 पेक्षा जास्त ओटीटी ॲप्समध्ये असलेले कॅन्टेट पाहू शकतात.
या प्लॅनमध्ये मिळेल JioTV+ ॲपचे ॲक्सेस
तुम्हाला सांगतो की सर्व Jio Fiber आणि Jio Air Fiber चे ग्राहक नवीन ॲप वापरू शकणार नाहीत. म्हणजेच हे ॲप वापरण्यासाठी ग्राहकांना सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. JioFiber पोस्टपेड चे 599 रुपये, 899 रुपये आणि त्यापेक्षा मोठा प्लॅन असणारे ग्राहक आणि JioFiber प्रीपेडचे 999 रुपये आणि त्याहून अधिक किंमतीचे प्लॅन असलेल्या ग्राहकांना या ॲपचे ॲक्सेस मिळेल.
JioTV+ ॲपचे ॲक्सेस कसे मिळवायचे
सर्वप्रथम तुम्हाला अँड्रॉईड टीव्ही, ॲपल टीव्ही आणि ॲमेझॉन फायर टीव्ही स्टिक वरील App Store वरून JioTV+ ॲप डाऊनलोड करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला या JioFiber किंवा JioAirfiber वरील नोंदणीकृत मोबाईल नंबरने ॲपमध्ये लॉग इन करावे लागेल. लॉग इन केल्यानंतर आपण ॲपवरील उपलब्ध कंन्टेट पाहू शकाल.
JioTV+ ॲपमध्ये मिळतील हे ओटीटी
या ॲपमध्ये तुम्हाला जिओ सिनेमा प्रीमियम, डिज्नी+हॉटस्टार, सोनीलीव, झी5, सन एनएक्सटी, होईचोई, डिस्कव्हरी प्लस, लायन्सगेट प्ले, फॅनकोड, ई टीव्ही विन, शेमारूमी, इरॉस नाऊ, आल्ट बालाजी या ओटीटी ॲपच्या सबस्क्रिप्शनचा लाभ मिळेल.
JIOTV+ वर मिळतील हे चॅनेल्स
या ॲपवर कलर्स टीव्ही, ई टीव्ही, सोनी सब, स्टार प्लस, झी टीव्ही, आज तक, इंडिया टीव्ही, टीव्ही9 भारत वर्ष, एबीपी न्यूज, न्यूज 18, सोनी टेन, स्पोर्ट्स18, स्टार स्पोर्ट्स, युरोस्पोर्ट्स, डीडी स्पोर्ट्स, B4U म्युझिक, 9XM, एमटीव्ही, झूम, पोगो, कार्टून नेटवर्क, निक ज्युनिअर, डिस्कव्हरी किड्स, झी बिझनेस, सीएनबीसी टिव्ही18, ईटी नाऊ, सीएनबीसी आवाज, आस्था, भक्ती टीव्ही, पिटीसी सिमरन, संस्कार यांसारखे चॅनेल्स पाहायला मिळतील.
