काही दिवसांपूर्वीच जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया सारख्या देशातील मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज प्लॅनच्या किमती वाढवल्या होत्या. साहजिकच टेलिकॉम कंपन्यांच्या या निर्णयावर लोक खूश नाहीत. यामुळेच अनेक यूजर्स आता बीएसएनएलचा अवलंब करण्याबाबत बोलत आहेत. या कारणास्तव #BSNL_ची_ घरवापसी हा X (ट्विटर) वर ट्रेंड करू लागला. त्याचवेळी ताजी बातमी अशी आहे की, बिहारमध्ये बीएसएनएलच्या नवीन 4G सिमच्या विक्रीतही वाढ झाली आहे. दररोज 8 हजार ते 10 हजार सिमची विक्री होत आहे. याशिवाय, बीएसएनएल देखील आपल्या नेटवर्कवर स्विच करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करत आहे. चला येथे माहिती घेऊया की, तुम्ही बीएसएनएल नेटवर्कवर स्विच केल्यास तुम्हाला कोणते फायदे मिळतील?
BSNL वर स्विच करण्याचे फायदे
- जुन्या किंमतीत मिळत आहेत प्लॅन: आम्ही तुम्हाला सांगतो की अलीकडे जिओने रिचार्ज प्लॅनच्या किंमतींमध्ये सर्वाधिक वाढ केली आहे. कंपनीने एकाच वेळी थेट 12 ते 25 टक्क्यांनी किमती वाढवल्या आहेत. त्याचबरोबर सरकारी कंपनी आजही लोकांना जुन्या किंमतीत रिचार्ज देत आहे.
- 4G नेटवर्कही ही सुरु: काही काळापूर्वी बातमी आली होती की, भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने 4G लाँच करणे सुरू केले आहे. BSNL 4G ची सुरुवात तामिळनाडूच्या तिरुवल्लुवर जिल्ह्यातून झाली आहे. मात्र, याआधीही अनेक सर्कलमध्ये 4G सेवा सुरू होती. परंतु सध्या संपूर्ण देशात BSNL 4G ची सेवा उपलब्ध नाही.
- स्वस्त प्लॅन: एकीकडे Jio, Airtel आणि Vi चे रिचार्ज प्लॅन महाग झाले आहेत. तर दुसरीकडे बीएसएनएलचे मोबाईल प्लॅन या तीन खासगी कंपन्यांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत. बीएसएनएल दीर्घ वैधतेसाठी सर्वोत्तम योजना ऑफर करत आहे.
- कॉलची स्पष्टता: बीएसएनएल सीडीएमए नेटवर्क वर दिल्ली आणि मुंबई वगळता संपूर्ण भारतातील कव्हरेज वर चांगली आवाज गुणवत्ता प्रदान करते. बीएसएनएल सीडीएमए नेटवर्क कव्हरेज अगदी दुर्गम आणि खोलवरच्या ग्रामीण भागातही उपलब्ध आहे, जिथे खाजगी कंपन्यांची पोहोच अजूनही कमी आहे.
- शक्तिशाली नेटवर्क कव्हरेज: बीएसएनएल सीडीएमए मोबाईलच्या जागतिक स्तरावरील तंत्रज्ञानासह कॉल करताना पूर्ण स्पष्टतेचा आनंद घ्या आणि अतूट नेटवर्क कव्हरेजचा देखील आनंद घेऊ शकता. त्याचवेळी अशी बातमी आहे की, कंपनी लवकरच 4G आणि 5G नेटवर्क देखील लाईव्ह करणार आहे.
- एका कॉलवर मदत: तर तुम्हाला मदत हवी असल्यास, बीएसएनएल नंबर – ‘1502’ डायल करा, जो देशभरात कुठूनही डायल केला जाऊ शकतो. तुम्ही देशभर पसरलेल्या आमच्या ग्राहक सेवा केंद्रांशी (CSC) संपर्क साधू शकता.
- युएमएस/व्हॉइसमेल: जेव्हा तुमचा हँडसेट बंद असतो किंवा तुम्ही व्यस्त वेळापत्रकामुळे फोन कॉलला उत्तर देऊ शकत नसाल, तेव्हा बीएसएनएल व्हॉइसमेल तुमच्या कॉलला उत्तर देण्यास सक्षम आहे. याबद्दल सर्वात चांगली गोष्ट म्हणजे व्हॉइसमेल सेट करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क लागत नाही. तुम्ही ही सेवा वापरता तेव्हा तुम्हाला फक्त एका कॉलसाठी पैसे द्यावे लागतात.
पूर्व-ॲक्टिवेटेड व्हॉइस, डेटा, एसटीडी आणि आयएसडी: बीएसएनएल सीडीएमए मोबाईल कनेक्शनमध्ये व्हॉइस, एसएमएस, डेटा आणि एसटीडी आणि आयएसडी यांच्या सुविधा आहेत. एसटीडी/ आयएसडी कॉल करण्यासाठी कोणतीही प्रकारचे डिपॉझिट भरण्याची किंवा कसलाही किमान बॅलन्स ठेवण्याची गरज नाही.
टीप: जर तुम्ही या फायद्यांनंतर बीएसएनएल वर जाण्याचा विचार केला असेल, तर तुम्ही फक्त या लिंकवर क्लिक करून BSNL ला पोर्ट करण्याबद्दल माहिती मिळवू शकता.
लोकांना आवडू शकतात बीएसएनएलचे हे स्वस्त प्लॅन
खाजगी कंपन्यांच्या वाढलेल्या किमतींनंतर आता लोक स्वस्त आणि परवडणारे पर्याय शोधत आहेत, बीएसएनएल कडे वापरकर्त्यांसाठी आधीच अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. जर तुम्हाला कमी पैशात जास्त दिवसांसाठी रिचार्ज करायचे असेल तर आम्ही तुम्हाला खाली काही प्लॅनचे पर्याय सांगत आहोत. सर्व बीएसएनएल च्या सर्व प्लॅन्सची यादी तपासण्यासाठी येथे क्लिक करा.
बीएसएनएल रिचार्ज प्लॅन 239 रुपये
बीएसएनएलचा प्रीपेड प्लॅन एका महिन्याच्या वैधतेसह येतो. हा पॅक लोकल, एसटीडी आणि नॅशनल रोमिंगवर अमर्यादित व्हॉईस कॉलची सुविधा देतो. यामध्ये दररोज 2GB डेटा आणि दिवसाला 100 एसएमएस सुविधा देखील आहे. ही योजना मेसर्स ऑनमोबाईल ग्लोबल लिमिटेड द्वारे प्रोग्रेसिव्ह वेब ॲप (PWA) वर चॅलेंजस् एरिना मोबाईल गेमिंग सेवेसह येते.
बीएसएनएल रिचार्ज प्लॅन 769 रुपये
कंपनीच्या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉल्स आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. या पॅकमध्ये 84 दिवसांची वैधता आणि दररोज 2GB डेटा देखील मिळतो. याशिवाय, हा पॅक बीएसएनएल ट्यून्स, इरॉस नाऊ एन्टरटेन्मेंट सब्सक्रिप्शन, हार्डी मोबाईल गेम्स सर्व्हिसेस, चॅलेंजस एरिना मोबाईल गेमिंग सर्व्हिस, लिस्टन म्यूजिक, लोकधुन, जिंग, ॲस्ट्रॉटेल आणि गेमऑन या सेवांसह विनामूल्य येतो.
बीएसएनएल वैधता रिचार्ज प्लॅन 1,999 रुपये
बीएसएनएल चा 1,999 रुपयांचा हा प्रीपेड रिचार्ज प्लॅन 365 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये संपूर्ण भारतातील कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंग उपलब्ध आहे. याशिवाय, दररोज 3GB डेटाची सुविधा देखील आहे. एकदा मर्यादा पूर्ण झाल्यानंतर ही वापरकर्ते 80Kbps च्या कमी गतीने इंटरनेट वापरू शकतात. या प्रीपेड प्लॅनमध्ये संपूर्ण वर्षासाठी अमर्यादित सॉंग चेंज, लोकधुन सामग्री आणि इरॉस नाऊ सबस्क्रिप्शनसह मोफत पीआरबीटी यांची सेवा मिळते.
