Lava बाबत गेल्या आठवड्यातच आम्ही एक बातमी दिली होती ज्यात सांगण्यात आले होते कि हि भारतीय मोबाईल कंपनी इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये एक नवीन डाव टाकण्याच्या तयारीत आहे. माहिती मिळाली होती कि कंपनी देशात 4 नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे जे स्पेसिफिकेशन्स आणि स्टाईलच्या बाबतीत शानदार असतील पण लावा या फोन्सची किंमत खूप कमी ठेवेल. आज कंपनीने सांगितले आहे कि लावा मोबाईल्सच्या स्मार्टफोन्सची हि नवीन खेप येत्या 7 जानेवारीला बाजारात सादर केली जाईल.
Lava Mobiles ने आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडल वर टीजर व्हिडीओ शेयर करत माहिती दिली आहे कि कंपनी येत्या 7 जानेवारीला भारतात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून कंपनीचे नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात येतील. कंपनीने लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोन्सची नावे सांगितली नाहीत पण टीजरच्या माध्यमातून लावाने असे म्हटले आहे कि या लॉन्च नंतर इंडियन स्मार्टफोन इंडस्ट्री मध्ये मोठे बदल होतील.
The day when Smartphone industry will never be the same again#AbDuniyaDekhegi #ProudlyIndian pic.twitter.com/3bhzsKOmV3
— Lava Mobiles (@LavaMobile) December 28, 2020
91मोबाईल्सला आधी मिलेल्या माहितीनुसार 7 जानेवारीला लावा कंपनी फक्त स्मार्टफोन्सच नाही तर इतर मोबाईल ऍक्सेसरीज पण सादर करू शकते आणि यातील एक स्मार्ट फिटनेस बॅंड पण असेल. नवीन लावा स्मार्टफोन कंपनी द्वारे ऑनलाइन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाइन रिटेल स्टोर्स वर पण विकला जाईल जो देशात Xiaomi, Vivo आणि Oppo सारख्या चीनी कंपन्यांना टक्कर देईल.
हे देखील वाचा : भारतात येत आहे सर्वात पावरफुल फोन Oppo Reno 5 Pro 5G, लॉन्चच्या आधी इंडियन साइटवर झाला लिस्ट
किंमत असेल 20 हजारांपेक्षा कमी
काही रिपोर्ट्सनुसार कंपनी पुढच्या महिन्यात एका वर्चुअल इवेंट मध्ये आपले नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करण्याची तयारी करत आहे. पण याबाबत कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही. किंमतीबाबत कंपनीने माहिती दिली आहे कि लॉन्च केले जाणाऱ्या 4 फोन्सची किंमत 20,000 पेक्षा कमी असेल.
हे देखील वाचा : कमालीच्या फीचर्स सह नवीन वर्षात येईल Google Pixel 6, समोर आला पेटंट
चायनीज कंपन्यांना टक्कर
Lava Mobiles ने जर भारतात दमदार स्पेसिफिकेशन्स आणि शानदार लुक असलेले स्मार्टफोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी बजेट मध्ये सादर केले तर मोबाईल युजर्सची एक मोठी संख्या आहे जी देशी इंडियन कंपनीला प्राथमिकता देईल. लावाद्वारे शेयर केल्या गेलेल्या टीजरने तर स्पष्ट केले आहे कि कंपनी शाओमी-रियलमी सारख्या चायनीज कंपन्यांना आव्हान देण्यासाठी तयार आहे. लावाने या टीजर मध्ये ‘आता दुनिया देखेगी’ हॅशटॅगचा वापर करत चीनी कंपन्यांना आव्हान दिले आहे.
