Categories: बातम्या

फक्त 4949 रुपयांमध्ये लॉन्च झाला लावा चा 4जी फोन झेड60एस

टेक कंपनी लावा ने गेल्या महिन्यात भारतीय टेक बाजारात आपल्या झेड स्मार्टफोन सीरीज अंतर्गत झेड61 स्मार्टफोन लॉन्च केला होता. हा फोन लावा झेड60 चा नेक्स्ट वर्जन होता जो फक्त 5,750 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध आहे. तर आज लावा ने झेड60 चा अजून एक नवीन वर्जन लावा झेड60 एस नावाने भारतीय बाजारात लॉन्च केला आहे. कंपनी ने लावा झेड60एस 4,949 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे जो आॅनलाईन साइट्स सोबतच आॅफलाईन स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध होईल.

लावा झेड60एस चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 5 इंचाच्या एचडी आईपीएस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड ओरियो गो एडिशन वर सादर करण्यात आला आहे सोबतच हा 1.5गीगाहर्ट्ज क्वॉडकोर प्रोसेसर वर चालतो. एंडरॉयड गो एडिशन मुळे लावा चा हा फोन कमी स्पेसिफिकेशन्स असूनही फास्ट आणि लॅग फ्री प्रोसेसिंग करू शकतो.

कंपनी ने या फोन मध्ये 1जीबी रॅम दिला आहे. लावा झेड60एस 16जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक व फ्रंट पॅनल दोन्ही बाजूला 5 मेगापिक्सल चा रियर कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा देण्यात आला. हे दोन्ही कॅमेरा सेंसर सोबत फ्लॅश लाईट आहे. जे बोके इफेक्ट सह शानदार फोटो कॅप्चर करू शकतात.

लावा झेड60एस 4जी फोन आहे ज्यात ​डुअल सिम व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. लावा झेड60एस गोल्ड आणि ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये फक्त 4949 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

Published by
Siddhesh Jadhav