Realme GT Neo 6 चे स्पेसिफिकेशन लाँचच्या आधी ई-कॉमर्स साईटवर लिस्ट, जाणून घ्या माहिती

होम मार्केट चीनमध्ये Realme GT Neo 6 मोबाईल लवकर सादर होणार आहे. परंतु अजून ब्रँडने लाँचची तारीख ठरविली नाही, याआधी फोनचे स्पेसिफिकेशन ई-कॉमर्स साईट JD Mall वर समोर आले आहेत. तसेच काही दिवसानंतर या लिस्टिंगला काढून टाकले आहे, परंतु स्क्रीनशॉटच्या माध्यमातून महत्त्वाची माहिती मिळाली आहे. आशा आहे की काही दिवसांमध्ये सादर होण्याची तारीख पण कंफर्म असू शकते. चला, पुढे लीक सविस्तर जाणून घेऊया.

Realme GT Neo 6 झेडी मॉल लिस्टिंग

  • Realme GT Neo 6 ला झेडी मॉल वेबसाईटवर GizmoChina ने स्पॉट केले आहे. ज्याचा स्क्रीनशॉट तुम्ही खाली पाहू शकता.
  • लिस्टिंगनुसार Realme GT Neo 6 मध्ये Snapdragon 8s Gen 3 चिपसेटसह 1TB इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
  • स्मार्टफोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग असणार असल्याची पण पुष्टी करण्यात आली आहे, ज्याला सर्वात फास्ट चार्जिंग असलेला Snapdragon 8s Gen 3 फोन बनवू शकते.
  • डिव्हाईसच्या बॅटरी बाबत माहिती अजून देण्यात आली नाही, परंतु पूर्व लीकनुसार Realme GT Neo 6 5,500mAh ची बॅटरीसह येऊ शकतो.
  • लिस्टिंगमध्ये Realme GT Neo 6 ची किंमत पाहायला मिळाली नाही, परंतु आशा आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये याला चीनमध्ये सेलसाठी उपलब्ध केले जाऊ शकते.

Realme GT Neo 6 चे स्पेसिफिकेशन (संभाव्य)

  • डिस्प्ले: Realme GT Neo 6 मध्ये 6.78-इंचाचा 1.5K अ‍ॅमोलेड डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. यावर 120Hz रिफ्रेश रेट आणि 6,000 निट्स अधिकतम ब्राईटनेस मिळू शकतो.
  • प्रोसेसर: पूर्व लीक, सर्टिफिकेशन आणि झेडी मॉल लिस्टिंगमध्ये फोनला Snapdragon 8s Gen 3 चिपसेट असलेला सांगण्यात आले आहे.
  • स्टोरेज: स्मार्टफोनला 1TB UFS 4.0 इंटरनल स्टोरेज, 24GB LPDDR5x रॅमसह लाँच केले जाऊ शकते.
  • कॅमेरा: Realme GT Neo 6 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळू शकतो ज्यात OIS सह 50MP चा IMX882 प्रायमरी सेन्सर, 8MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच, सेल्फीसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी: स्मार्टफोनमध्ये 5,500mAh ची मोठी बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग असणार आहे.
  • ओएस: रियलमीचा हा नवीन मोबाईल अँड्रॉईड 14 सह realme UI 5 वर काम करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here