OnePlus Nord CE4 कितीला मिळत आहे? येथे जाणून घ्या किंमत, डिस्काऊंट ऑफर आणि स्पेसिफिकेशनची संपूर्ण माहिती

OnePlus Nord CE4 भारतात लाँच झालेला कंपनीचा सर्वात नवीन स्मार्टफोन आहे. आजपासून ठिक एक महिन्यापूर्वी 4 एप्रिलला हा पहिल्यांदा देशात सेलसाठी उपलब्ध झाला होता आणि अनेक मोबाईल युजर्सनी याला पसंद केले होते. जर तुम्ही पण लेटेस्ट वनप्लस फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात तर या दिवशी नॉर्ड सीई 4 वर मस्त डिस्काऊंट मिळत आहे. या वनप्लस मोबाईलवर मिळत असलेल्या सर्व ऑफर्सची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

OnePlus Nord CE4 ची किंमत

 • 8GB RAM + 128GB Storage = ₹24,999
 • 8GB RAM + 256GB Storage = ₹26,999

वनप्लस नॉर्ड सीई 4 5 जी फोन 8 जीबी रॅमवर भारतात लाँच झाला होता जो दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. फोनच्या 128GB मॉडेलला 24,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच मोठ्या Nord CE4 256GB मॉडेलची किंमत 26,999 आहे. हा वनप्लस फोन Dark Chrome आणि Celadon Marble दोन रंगामध्ये विकत घेतला जाऊ शकतो.

OnePlus Nord CE4 ऑफर

 • ICICI Bank ग्राहक जर कंपनी वेबसाईटवरून वनप्लस नॉर्ड सीई 4 5 जी फोन खरेदी करणार असतील तर त्यांना 2,000 रुपयांचा डिस्काऊंट दिला जाईल.
 • HDFC Bank च्या Debit या Credit Card वरून जर EMI बनविले जात असतील तर कंपनीकडून 2,000 रुपयांची सूट मिळेल.
 • IDFC First Bank Credit Card च्या माध्यमातून फोनचे पेमेंट केल्यावर पण ग्राहकांना 2,000 रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट मिळेल.
 • One Card द्वारे केली जाणारे क्रेडिट कार्ड पेमेंट तसेच ईएमआय ट्रँजॅक्शनवर पण हा फोन 2,000 रुपयांच्या सूट सह मिळेल.
 • OnePlus Nord CE4 6 months No-Cost EMI स्कीमवर पण विकत घेता येईल.
 • नवीन नॉर्ड सीई 4 चालविणाऱ्या ग्राहकांना 3 महिन्याचा YouTube Premium free मिळेल.
 • OnePlus Nord CE4 मध्ये रिलायन्स जिओ सिम वापर केल्यावर 2250 रुपयांचे Jio benefits मिळतील. यात रिचार्ज कुपन डिस्काऊंट व फ्री जिओ अ‍ॅप सब्सक्रिप्शन मिळेल.

उपरोक्त बँक तसेच कार्डचा वापर केल्यावर ग्राहकांना नवीन OnePlus Nord CE4 22,999 रुपयांमध्ये मिळेल. अधिकृतपणे कंपनी वेबसाईटवरून हा फोन खरेदीसाठी क्लिक करा : OnePlus.in

OnePlus Nord CE4 चे स्पेसिफिकेशन्स

 • 6.7″ 120 हर्ट्झ अ‍ॅमोलेड डिस्प्ले
 • क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 3
 • 8 जीबी वचुर्अल रॅम
 • 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
 • 50 एमपी ड्युअल रिअर कॅमेरा
 • 16 एमपी सेल्फी कॅमेरा
 • 5,500 एमएएचची बॅटरी
 • 100 वॉट सुपरवूक चार्जिंग

डिस्प्ले : वनप्लस नॉर्ड सीई 4 5 जी फोन 2412 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही स्क्रीन फ्लूइड अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 2160 हर्ट्झ पीडब्ल्यूएम डिमिंगला सपोर्ट करते.

परफॉर्मन्स : हा वनप्लस फोन अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे जो ऑक्सिजन ओएस 14 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 3 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.63 गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो.

मेमरी : OnePlus Nord CE4 5G फोन 8 जीबी रॅमवर लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये 8 जीबी एक्सपांडेबल रॅम टेक्नॉलॉजी पण आहे जो याच्या फिजिकल रॅमसह मिळून याला 16 जीबी रॅमची ताकद प्रदान करतो. नॉर्ड सीई 4 मध्ये 128 जीबी व 256 जीबी स्टोरेज मिळते ज्याला 1 टीबी पर्यंत वाढवता येते.

कॅमेरा : फोटोग्राफीसाठी नॉर्ड सीई 4 5 जी फोनच्या बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सल सोनी एलवायटी 600 मेन सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड आयएमएक्स 355 लेन्ससह मिळून चालतो. तसेच इन्स्टाग्राम रिल्स बनविणे आणि सेल्फी काढण्यासाठी Nord CE4 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी : पावर बॅकअपसाठी वनप्लस नॉर्ड सीई 4 5,500 एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 100 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जो कंपनीच्या दाव्यानुसार फक्त 29 मिनिटामध्ये याला 1% ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकते.

इतर फिचर्स : OnePlus Nord CE4 5G फोन IP54 रेटेड आहे. यात USB Type-C 2.0, Bluetooth 5.4 आणि 5GHz dual-band Wi-Fi सारखे कनेक्टिव्हिटी फिचर्स मिळतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here