चायनीज स्मार्टफोन ब्रँड LeEco लवकरच नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. LeEco ब्रँडने 2016-17 ने भारतीय बाजारात खूप हवा केली होती. कंपनीने त्याकाळी भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये निरनिराळ्या रेंजचे स्मार्टफोन सादर केले होते. स्मार्टफोनसह कंपनीने टीव्ही, ऑडियो प्रोडक्ट आणि अनेक डिवाइसेस लॉन्च केले होते. आता कंपनी एक स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. कंपनीने LeTV स्मार्ट इकोलॉजिकल कॉन्फरन्समध्ये सांगितले कि कंपनी लवकरच चीनमध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. टिपस्टर मुकुल शर्माने काही स्क्रीनशॉट शेयर करून सांगितले आहे कि LeEco लवकरच मार्केटमध्ये LeTV Super Phone स्मार्टफोन लॉन्च करून आपल्या दमदार पुनरागमनाची तयारी करत आहे. कंपनी भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये पुनरागमन करेल कि नाही हे अजून स्पष्ट झाले नाही. (LeEco will launch soon LeTV super phone smartphone)
LeTV Super Phone स्मार्टफोनमध्ये नॅरो बॅजल देण्यात आले आहेत. तसेच फोनमध्ये पावर बटण आणि वॉल्यूम रॉकर डावीकडे देण्यात आले आहेत. त्याचबरोबर या स्मार्टफोनमध्ये कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. अपकमिंग LeTV Super Phone स्मार्टफोन फ्लॅगशिप किंवा प्रीमियम मिड-रेंजमध्ये सादर केला जाऊ शकतो. सध्या कंपनीने LeTV Super Phone च्या स्पेसिफिकेशन्स किंवा फीचर्सचा खुलासा केला नाही.
हे देखील वाचा : अश्याप्रकारे करा BATTLEGROUNDS MOBILE INDIA मोबाईल गेम, भारतात रजिस्ट्रेशन झाले सुरु
So yes, LeTV phones are right around the corner.#LeTV pic.twitter.com/wFZMnDcBxF
— Mukul Sharma (@stufflistings) May 18, 2021
कंपनी लवकरच हा स्मार्टफोन लॉन्च करू शकते. कंपनी स्मार्टफोन मार्केटपूर्ती मर्यादित राहील कि दुसरे प्रोडक्ट पण लॉन्च करेल हे अजून समजले नाही. आर्थिक संकटांमुळे LeEco ने भारतीय मार्केटमधून माघार घेतली होती. पण ती गृह मार्केट चीनमध्ये अॅक्टिव्ह होती. गेल्यावर्षी कंपनीने होम मार्केट चीनमध्ये LeTV Zero65 Pro अल्ट्रा स्लिम मोरल टीव्ही लॉन्च केला होता. हा टीव्ही कंपनीने चीनमध्ये 6999 RMB (जवळपास 70,000 रुपये) च्या किंमतीत सादर केला होता.
हे देखील वाचा : Snapdragon 888 सह येणाऱ्या बेस्ट फोनची संपूर्ण यादी, बघा कोणता आहे तुमच्या योग्य
लीइको अपकमिंग स्मार्टफोन LeTV Super Phone बद्दल सध्या कंपनीने कोणतीही ऑफिशियल माहिती शेयर केली नाही. अपकमिंग LeTV Super Phone स्मार्टफोन लॉन्च जवळ येताच अजून माहिती समोर येईल.
