Home बातम्या जगातील पहिला 6 कॅमेरे असलेला फोन, लेनोवो करेल 18 ऑक्टोबरला लॉन्च

जगातील पहिला 6 कॅमेरे असलेला फोन, लेनोवो करेल 18 ऑक्टोबरला लॉन्च

लेनोवो ने यावर्षी अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपला बजेट स्मार्टफोन एस5 लॉन्च केला होता. हा फोन चीन मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या कि कंपनी हि सीरीज वाढवत यात एक शानदार स्मार्टफोन लेनोवो एस5 प्रो आणण्याची तयारी करत आहे. अनेक लीक्स आल्यानंतर लेनोवो चे वाइस प्रेजिडेंट चँग चेंग ने लेनोवो एस5 प्रो ची लॉन्च डेट सांगितली आहे. येत्या 18 ऑक्टोबरला हा फोन चीन मध्ये सादर केला जाईल.

लेनोवो वाइस प्रेजिडेंट चँग चेंग ने सोशल मीडिया प्लॅटफार्म वरून लेनोवो एस5 प्रो च्या लॉन्चची माहिती दिली आहे. चँग ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 18 ऑक्टोबरला चीन मध्ये एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून लेनोवो एस5 प्रो लॉन्च केला जाईल. विशेष म्हणजे चँग यांनी अद्धिच सांगितले आहे कि लेनोवो एस5 प्रो 4 रियर कॅमेऱ्यांसह लॉन्च केला जाईल म्हणजे फोनच्या बॅक पॅनल वर 4 कॅमेरा सेंसर असतील.

लेनोवो एस5 प्रो जगातील पहिला असा स्मार्टफोन असेल ज्यात 6 कॅमेरा असतील. फोनच्या बॅक पॅनल वर 4 कॅमेरा सेंसर असतील तर फ्रंट पॅनल वर डुअल सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. एस5 प्रो च्या कॅमेरा प्लेसमेंट व्यतिरिक्त कंपनी ने कॅमेरा पावर आणि अन्य स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली नाही पण फोनच्या शेयर झालेल्या फोटो वरून समजले आहे कि एस5 प्रो मध्ये सुपर 2एक्स आॅप्टिकल झूम सेंसर असतील जे आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतील. फोनच्या कॅमेरा ऍप्प मध्येच एआई आधारित शूटिंग मोड मिळतील.

एस5 प्रो बद्दल समोर आलेल्या लीक्स नुसार लेनोवो आपला फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करेल या फोन मध्ये 6.5-इंचाचा क्यूएचडी+ आईपीएस एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो. लीक नुसार एस5 प्रो 6जीबी रॅम तसेच 8जीबी रॅम वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो तसेच हा फोन क्वालकॉम च्या पावरफुल चिपसेट 845 वर चालेल.

लेनोवो एस5 प्रो तीन स्टोरेज वेरिएंट मध्ये बाजारात येऊ शकतो. ज्यात 64जीबी, 128जीबी आणि 256जीबी ची इंटरनल मेमरी देण्यात येईल. तसचे लीक नुसार हा फोन 4,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च केला जाऊ शकतो. पण एस5 प्रो च्या स्पेसिफिकेशन्स बद्दल लेनोवो ने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही त्यामुळे लेनोवो एस5 प्रो ची किंमत आणि याच्या ठोस स्पेसिफिकेशन्स साठी 18 ऑक्टोबरच्या फोन लॉन्चची वाट बघावी लागेल.