लेनोवोनं ग्लोबल मार्केटमध्ये आपला टॅबलेट प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवला आहे. कंपनीनं नवीन Lenovo Tab Plus लाँच केला आहे. यात युजर्सना 11.5 इंचाचा मोठा 2के एलसीडी डिस्प्ले, मीडियाटेक Helio G99 प्रोसेसर, डॉल्बी अॅटमॉस स्पिकर सारखे अनेक दमदार स्पेसिफिकेशन मिळतात. चला, जाणून घेऊया लेनोवो टॅब प्लसची किंमत आणि फुल फीचर्स.
Lenovo Tab Plus चे स्पेसिफिकेशन्स
स्क्रीन: Lenovo Tab Plus टॅबलेटमध्ये 11.5 इंचाचा मोठा एलसीडी डिस्प्ले आहे. जो 2के पिक्सल (2000 X 1200) रिजॉल्यूशन, 90Hz रिफ्रेश रेट आणि 400 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो.
चिपसेट: डिव्हाइसमध्ये युजर्सना दमदार अनुभवासाठी मीडियाटेक Helio G99 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे.
स्टोरेज: डेटा स्टोर करण्यासाठी टॅबमध्ये 8GB रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज मिळते. त्याचबरोबर मायक्रो एसडी कार्ड स्लॉटच्या मदतीनं स्टोरेज वाढवता देखील येते.
कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता टॅबलेटच्या फ्रंट आणि रियर पॅनलवर 8मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. तसेच, रियर सेटअप कॅमेरा ऑटो फोकस टेक्नॉलॉजीसह आला आहे.
बॅटरी: या लेनोवो टॅबलेटची सर्वात मोठी खासियत म्हणजे याची बॅटरी. कारण यात ब्रँडनं 8600mAh ची बॅटरी दिली आहे. जी फास्ट चार्ज करण्यासाठी 45वॉट फास्ट चार्जिंग आहे.
ओएस: ऑपरेटिंग सिस्टम पाहता टॅब अँड्रॉइड 14 वर चालतो. सोबत 2 वर्ष OS अपग्रेड आणि 2028 पर्यंत सिक्योरिटी अपडेट मिळतील.
अन्य: Lenovo Tab Plus मध्ये 8 स्पिकर डॉल्बी अॅटमॉस टेक्नॉलॉजीसह देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय 5, ब्लूटूथ 5.2, यूएसबी टाइप सी, 3.5मिमी हेडफोन जॅक मिळतो.
Lenovo Tab Plus ची किंमत
- Lenovo Tab Plus दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये ग्लोबली लाँच झाला आहे. ज्यात 8GB रॅम +128GB स्टोरेज आणि 8GB रॅम +256GB स्टोरेजचा समावेश आहे.
- लेनोवोचा हा टॅब निवडक बाजारांमध्ये 279€ म्हणजे भारतीय किंमतीनुसार जवळपास 25,000 रुपयांची प्रारंभिक किंमतीत उपलब्ध आहे.
- नवीन डिवाइस युजर्सना लूना ग्रे रंग ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
