Lenovo Mobiles पावरफुल स्पेसिफिकेशन्स आणि दमदार बिल्ड क्वॉलिटी वाल्या स्मार्टफोन्स साठी ओळखली जाते. Lenovo प्रोडक्ट्स भारतात पण लोकांना आवडतात. आपल्या भारतीय फॅन्ससाठी Lenovo कंपनी काहीशी मोठी तयारी करत आहे. कंपनी लवकरच भारतात आपले नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Lenovo ने सांगितले आहे कि कंपनी येत्या 5 सेप्टेंबरला भारतात एक साथ तीन नवीन डिवाईस लॉन्च करेल आणि यात Lenovo Z6 Pro, K10 Note आणि A6 Note चा समावेश असेल.
Lenovo ने मीडियो इन्वाईट पाठवत आपल्या नवीन प्रोडक्ट्सच्या लॉन्च डेट सोबतच यांच्या नावाचा खुलासा पण केला आहे. Lenovo ने सांगितले आहे कि कंपनी 5 सेप्टेंबरला राजधानी दिल्ली मध्ये ईवेंटचे आयोजन करेल आणि या ईवेंटच्या मंचावरून कंपनीचा एक स्मार्टफोन आणि दोन नोट डिवाईस भारतीय बाजारात येतील. याच दिवशी कंपनी Lenovo Z6 Pro सोबत Lenovo K10 Note आणि Lenovo A6 Note पण लॉन्च करेल.
Lenovo Z6 Pro
हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.39-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंरगप्रिंट सेंसर पण आहे. Lenovo Z6 Pro एंडरॉयड 9 पाई आधारित जेडयूआई 11 सह 2.84गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाले आक्टा-कोर प्रोसेसर आणि 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर चालतो.
फोनच्या बॅक पॅनल वर डुअल टोन एलईडी फ्लॅश सह 4 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. यात एफ/1.8 अपर्चर वाला 48-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर + 16-मेगापिक्सलची 125डिग्री सुपर वाइड एंगल लेंस + एफ/2.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस + एफ/1.8 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. तर सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Lenovo Z6 Pro 12जीबी, 8जीबी आणि 6जीबी रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे जे 512जीबी, 256जीबी आणि 128जीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. Lenovo Z6 Pro गेम टर्बो फीचर सह येतो जो हेवी गेम्स पण स्मूदली प्ले करतो. फोन मध्ये डुअल सिम व 4जी वोएलटीई सह पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 27वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. चीन मध्ये हा फोन रेड-ब्लॅक आणि ग्रीन-ब्लू कलर वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे.
Lenovo K10 Note
Lenovo K10 Note गेल्यावर्षी भारतात लॉन्च झालेल्या Lenovo K9 Note चा अपग्रेडेड वर्जन असेल. या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच रियर कॅमेरा सेटअप मध्ये एफ/2.4 अपर्चर वाली 8-मेगापिक्सलचा टेलीफोटो लेंस सोबत एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा तीसरा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Lenovo A6 Note
Lenovo A6 Note चे जास्त स्पेसिफिकेशन्स समजले नाहीत पण काही दिवसांपूर्वी हा फोन Lenovo L19041 मॉडेल नंबर सह गीकबेंच वर लिस्ट झाला होता जिथे फोनचे काही स्पेसिफिकेशन्स समजले होते. गीकबेंच नुसार Lenovo A6 Note एंडरॉयड 9 पाई आधारित असेल जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हेलीयो पी22 चिपसेट वर लॉन्च केला जाईल. गीकबेंच वर Lenovo A6 Note 3जीबी रॅम मेमरी सह दाखवण्यात आला होता.
लेनोवो झेड6 प्रो वीडियो
