एलजी फोन बद्दल यूजर्स ची नेहमीच तक्रार असते की त्यांच्या फोनची किंमत जास्त असते. परंतु कंपनी चा हा नवीन फ्लॅगशिप फोन बघून लोकं असे म्हणणार नाहीत. कोरियन मोबाइल फोन निर्माता कंपनी एलजी ने आज भारतीय बाजारात आपला फ्लॅगशिप फोन जी7 थिंक प्लस सादर केला आहे आणि याची किंमत 39,999 रुपये आहे. हा फोन आॅनलाइन स्टोर फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे आणि 10 ऑगस्ट पासून हा विकत घेता येईल.
एलजी जी7 प्लस थिंक बद्दल बोलायचे तर कंपनी ने हा आयफोन 10 प्रमाणे नॉच डिस्प्ले सह सादर केला आहे. हा कंपनी चा पहिला फोन आहे ज्यात तुम्हाला नॉच डिस्प्ले मिळेल. फोन मध्ये 6.1-इंचाचा क्वॉडएचडी+ (1440×3120 पिक्सल रेजल्यूशन) 1000 निट्स वाला फुलव्यू सुपर ब्राइट डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनी ने हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह सादर केला आहे. फोन चा डिस्प्ले शानदार आहे.
या सोबत चांगली बाब म्हणजे एलजी जी7 प्लस थिंक ची स्क्रीन गोरिल्ला ग्लास 5 ने कोटेड आहे ज्यामुळे हा नुसताच मजबूत होत नाही तर स्क्रॅच प्रूफ पण होतो. फोन ची बॉडी ग्लास पासून बनलेली आहे.
हा फोन क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालतो आणि फोन मध्ये कोरियो आर्किटेक्चर वाला आॅक्टा-कोर प्रोसेसर (4×2.8गीगाहट्र्ज कोरयो 385 गोल्ड + 4×1.7गीगाहट्र्ज कोरयो 385 सिल्वर) देण्यात आला आहे. तसेच चांगल्या ग्राफिक्स साठी फोन मध्ये एड्रीनो 630 चिपसेट आहे जो भरभक्कम ग्राफिक्स पण सहज दाखवू शकतो.
एलजी जी7 प्लस थिंक मध्ये 6जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि जो 2टीबी पर्यंत एक्सपांड करता येईल.
चांगल्या स्पेसिफिकेशन सोबतच या फोन मध्ये चांगले कॅमेरा फीचर्स आहेत. फोन मध्ये 16-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. कंपनी ने हा एफ/1.9 आणि एफ/1.6 अपर्चर सह सादर केला आहे जो पोर्टेट मोड सोबत वाइड एंगल फोटो घेण्यास सक्षम आहे. कॅमेरा सोबत लेजर पीडीएएफ आणि आॅप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सारखे आॅप्शन देण्यात आले आहेत. फोन चा फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सल चा आहे आणि हा कंपनी ने एफ/1.9 अपर्चर सह सादर केला आहे. हा मोठे फोटो घेण्यास सक्षम आहे.
एलजी जी 7 प्लस थिंक एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो सह सादर करण्यात आला आहे. या सोबत कंपनी ने यात थिंक यूआई दिला आहे. ही एलजी ची टेक्नोलॉजी आहे. कंपनीचा दावा आहे की ही हे ह्यूमन सेंट्रिक टेक्नोलॉजी आहे जी घरातील होम अप्लाइंस सहित अन्य डिवाइस सोबत कनेक्ट होऊन सहज कम्यूनिकेट करू शकते. त्याचबरोबर एआई चा वापर कॅमेरा आणि वॉइस रिकॉग्निशन सहित अन्य फीचर्स सोबत केला जाऊ शकतो.
एलजी चा एआई वॉईस कमांड गूगल वाइस सोबत चालतो आणि हा इंटरनेट सर्च सह फोन फीचर्स पण सर्च करण्यास सक्षम आहे. कंपनी ने यात खास गूगल असिस्टेंट बटन दिले आहे. म्यूजिक च्या बाबतीत पण हा काही कमी नाही. हा फोन हाई-फाई क्वॉड डेक, डीटीएस एक्स 3डी सराउंड साउंड आणि बूमबॉक्स सारख्या फीचर्स सह सादर करण्यात आला आहे.
एलजी जी7 थिंक आईपी68 सर्टिफाइड आहे ज्यामुळे हा फोन पाणी आणि धूळी पासून वाचू शकतो. हा फोन 1.5 मीटर खोल पाण्यात 30 तास राहू शकतो.
डाटा आणि सिक्योरिटी पाहता या फोन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर सह फेस अनलॉक वाला प्रीमियम फीचर पण दिला आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,000 एमएएच ची बॅटरी दिली आहे जी क्विक चार्ज 3.0 ला सपोर्ट करते.
प्राइस पाहता हा फोन खुप चांगला वाटतो आणि या रेंज मध्ये वनप्लस 6, सॅमसंग गॅलेक्सी एस9 आणि आॅनर 10 सारख्या फोन्सना टक्कर देतो.
