Home बातम्या 4,000एमएएच बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेऱ्यासह LG K42 झाला लॉन्च

4,000एमएएच बॅटरी आणि क्वॉड रियर कॅमेऱ्यासह LG K42 झाला लॉन्च

LG ने गेल्याच आठवड्यात अमेरिकन बाजारात आपला कमी किंमतीचा स्मार्टफोन LG Q31 लॉन्च केला होता जो डुअल कॅमेऱ्यासह आला आहे. आता एलजीने अजून एक नवीन स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मार्केट मध्ये आणला आहे. हा फोन LG K42 नावाने सादर केला गेला आहे जो मिडबजट मध्ये डोमिनिक रिपलिक मध्ये आला आहे. हा फोन क्वॉड कॅमेरा आणि मोठ्या बॅटरी सह येतो.

LG K42

एलजी के42 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. स्क्रीनच्या दोन्ही बाजू बेजल लेस आहेत तर वरच्या आणि खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे. हा फोन 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो.

LG K42 अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो एलजी यूएक्स वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट देण्यात आला आहे. एलजीचा हा नवीन फोन 3 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता पण येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एलजी के42 चौकोनी क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्या सोबत 5 मेगापिक्सलची सुपर वाइड लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

LG K42 सिक्योरिटीसाठी साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. एलजी ने आपला फोन MIL-STD-810G सर्टिफाइड बनवला आहे, ज्यामुळे हा थंडी आणि गर्मी पासून वाचतो तसेच स्क्रॅच पासून पण सुरक्षित राहतो. फोन मध्ये 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे आणि फोनचे डायमेंशन 165 x 76.7 x 8.4एमएम तसेच वजन 182ग्राम आहे.

LG K42 इंडिया आणि इतर मार्केट्स मध्ये कधी विक्रीसाठी उपलब्ध होईल, याबात जास्त माहिती समोर आलेली नाही तसेच फोनची किंमत पण समोर आलेली नाही.