Home बातम्या 64MP कॅमेरा आणि 6GB रॅम सह लॉन्च झाला नॉन-चायनीज LG K92 5G, जाणून घ्या याची किंमत

64MP कॅमेरा आणि 6GB रॅम सह लॉन्च झाला नॉन-चायनीज LG K92 5G, जाणून घ्या याची किंमत

टेक कंपनी LG अनेक दिवसांपासून मोबाईल मार्केट मध्ये एकापाठोपाठ एक नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या ‘K’ सीरीज मध्ये LG K62 आणि LG K52 लॉन्च केले होते. तर आता या दोन्ही फोन्स नंतर कंपनीने के-सीरीज मध्ये एक नवीन फोन LG K92 5G को सादर केला आहे. एलजी के92 5जी फोन क्वाड रियर कॅमेरा सेटअप सह येतो. तसेच एलजीने या फोन मध्ये 4,000 एमएएच ची बॅटरी दिली आहे आणि यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

दमदार कॅमेरा

फोटोग्राफीसाठी एलजी के92 5जी फोन मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल, जो चौकोनी आकारात आहे. या मॉड्यूल मध्ये f/1.78 लेंस आणि 81 डिग्री फील्ड ऑफर व्यू सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच f/2.2 लेंस आणि 115 डिग्री फील्ड ऑफर व्यू सह 5 मेगापिक्सलचा दुसरा कॅमेरा देण्यात आला आहे. तर f/2.4 लेंस सह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि f/2.4 लेंस सह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी एलजीच्या या फोन मध्ये f/2.0 लेंस आणि 77 डिग्री फील्ड ऑफर व्यू सह 16 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

हे देखील वाचा : रोटेटिंग स्क्रीन आणि अनोखी डिजाइन असलेला नॉन चीनी फोन LG Wing झाला लॉन्च, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये

स्पेसिफिकेशन्स

एलजी के92 5जी फोन एंड्रॉयड 10 वर चालतो, ज्यात 6.7 इंच फुल-एचडी+ होल-पंच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 690 प्रोसेसर व 6 जीबी रॅम सह येतो. इंटरनल स्टोरज 128 जीबी आहे, ज्यात 2 टीबी पर्यंत माइक्रो एसडी कार्ड सपोर्ट आहे.

फोनची बॅटरी 4,000 एमएएचची आहे. कनेक्टिविटीसाठी फोन मध्ये Wi-Fi 802.11 ac, एनएफसी, ब्लूटूथ 5.1 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये स्टीरियो स्पीकर्स, एलजी 3डी साउंड इंजन सपोर्ट आणि साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर पण आहे.

हे देखील वाचा : LG Velvet भारतात लॉन्च, ताकदवान स्पेसिफिकेशन्स सह इतकी दमदार डिजाईन कि पडल्यावर पण तुटणार नाही स्क्रीन

किंमत

एलजी के92 5जी फोनच्या 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत $359 (लजवळपास 26,600 रुपये) आहे. तसेच हा फोन को कंपनीने टाइटन ग्रे रिफ्लेक्टिड एक्सेंट्स मध्ये सादर केला आहे. उपलब्धता पाहता हा हँडसेट AT&T, Cricket Wireless आणि US Cellular च्या माध्यमातून उपलब्ध होईल. AT&T चा सेल 6 नोव्हेंबरला सुरु होईल, तर US Cellular ची विक्री कथितरित्या 19 नोव्हेंबर पासून सुरु होणार आहे.