Home बातम्या LG घेऊन येत आहे क्वाड कॅमेरा आणि पंच-होल डिस्प्ले असलेला K92 5G स्मार्टफोन, रेंडर्स झाले लीक

LG घेऊन येत आहे क्वाड कॅमेरा आणि पंच-होल डिस्प्ले असलेला K92 5G स्मार्टफोन, रेंडर्स झाले लीक

टेक कंपनी LG अनेक दिवसांपासून मोबाईल बाजरात लागोपाठ नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करत आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपल्या ‘K’ सीरीज मध्ये LG K62 आणि LG K52 लॉन्च केला होता. आता या दोन्ही फोन्सनंतर कंपनी के-सीरीज माडेच एक नवीन फोन आणण्याची तयारी करत आहे. हा कथित फोन LG K92 नावाने सादर केला जाऊ शकतो. तसेच ऑफिशियल होण्याआधी या आगामी फोनचे रेंडर ऑनलाइन समोर आले आहेत, त्यामुळे फोनच्या डिजाइनचा खुलासा झाला आहे. हा फोन दक्षिण कोरियन टेक दिग्गजच्या के-सीरीजचा पहिला 5जी फोन असेल.

टिप्सटर इवान ब्लासने LG K92 5G चे रेंडर्स प्रसिद्ध केले आहेत. हे रेंडर्स Voice नावाच्या ब्लॉग वर शेयर करण्यात आले आहेत. रेंडर्सनुसार फोनच्या बॅक पॅनल वर क्वाड कॅमेरा सेटअप असेल, त्यात 64-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर दिला जाईल. कॅमेरा फोनच्या मागे चौकोनी आकारात डावीकडे आहे. तसेच रेंडर्स मध्ये क्वाड-एलईडी फ्लॅश सेटअप पण दिसत आहे जो चौकोनी आकारात वर उजवीकडे आहे.

तसेच LG K92 5G मध्ये होल-पंच डिस्प्ले असेल, त्यामुळे चारही बाजूनी बेजल कमी असतील. रेंडर्स मध्ये समोर आले आहे कि वॉल्यूम बटन मधेच डेडिकेटिड गूगल असिस्टेंट का बटन डावीकडे आहे. फोनच्या उजवीकडे पावर बटन असेल जो फिंगरप्रिंट सेंसरचे पण काम करेल. फोन मध्ये 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे.

Blass नुसार LG K92 5G अमेरिकेत क्रिकेट वायरलेस म्हणून विकला जाईल. फोनच्या मागे टेलीकॉम ब्रँडिंग पण दिसत आहे. LG ने अधिकृतपणे K92 5G फोन बाबत कोणतीही माहिती दिली नाही.

ऑगस्ट मध्ये https://www.91mobiles.com/hi/lg-q92-price-in-india दक्षिण कोरिया मध्ये लॉन्च केला गेला होता. फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 765G SoC आणि स्मार्टफोन मध्ये 6.67 इंचाचा फुल-एचडी + होल-पंच डिस्प्ले आहे. यात एक क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 48-मेगापिक्सल शूटर आहे. सेल्फीसाठी, फोन 32-मेगापिक्सेलच्या स्नॅपर सह येतो. 5 जी सपोर्ट व्यतिरिक्त, फोन वर कनेक्टिविटीसाठी वाई-फाई, ब्लूटूथ 5.0, एनएफसी आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे.