Home बातम्या 4जीबी रॅम आणि एस पेन सह एलजी क्यू स्टाइलस+ लॉन्च

4जीबी रॅम आणि एस पेन सह एलजी क्यू स्टाइलस+ लॉन्च

टेक कंपनी एलजी ने गेल्या दोन आठवड्यात भारतात दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. कंपनी ने स्वस्त स्मार्टफोन एलजी कँडी सह सोबतच 15,990 रुपयांचा एलजी क्यू7 काही दिवसांपूर्वी भारतीय बाजारात आणला आहे. आज पुन्हा इंडियन मार्केट मध्ये अजून एक नवीन डिवाईस आणत कंपनी ने आपल्या क्यू स्मार्टफोन सीरीज मध्ये एलजी क्यू स्टाइलस+ लॉन्च केला आहे. एलजी क्यू स्टाइलस प्लस 21,990 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो उद्यापासून सेल साठी उपलब्ध होईल.

एलजी क्यू स्टाइलस+ चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो मेटल बॉडी वर बनला आहे. फोन मध्ये 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा फुलएचडी+ फुलविजन डिस्प्ले देण्यात आला आहे जो कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. एलजी ने हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर केला आहे जो 1.5गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर वर चालतो. कंपनी ने अजूनतरी चिपसेट ची माहिती दिली नाही.

कंपनी ने क्यू स्टाइलस+ मध्ये 4जीबी रॅम दिला आहे. हा फोन 64जीबी इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 2टीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सोबत 16-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे ज्यात पीडीएएफ सारखे फीचर्स आहेत. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

एलजी क्यू स्टाइलस+ मध्ये 4जी एलटीई सह वाईफाई, ब्लूटूथ आणि एनएफसी सारखे फीचर्स आहेत. फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट व फास्ट चार्जिंग सपोर्ट सह पावर बॅकअप साठी 3300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. क्यू स्टाइलस+ च्या काही खास फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर हा डिवाईस आईपी68 रेटिंग सह आला आहे ज्यामुळे हा धूळ व पाणी पासून वाचतो. तसेच फोन च्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

एलजी ने क्यू स्टाइलस+ स्टाइलस पेन सोबत भारतात लॉन्च केला आहे ज्यामुळे नोट डिवाईस प्रमाणे पेन ने फोनचा वापर सोप्पा आणि मजेदार होतो. एलजी क्यू स्टाइलस+ आरोरा ब्लॅक आणि मोरोक्कन ब्लू कलर वेरिएंट मध्ये सादर करण्यात आला आहे जो 21,990 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध होईल.