एलजी ने मे महिन्यात अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपल्या क्यू सीरीज मध्ये एक साथ तीन स्मार्टफोन एलजी क्यू7, एलजी क्यू7+ आणि एलजी क्यू7 अल्फा सादर केले होते. हे तिन्ही स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या फुलविजन डिस्प्ले सह लॉन्च करण्यात आले होते. तसेच भारतीय बाजारात आपल्या क्यू सीरीजला पुढे नेत एलजी ने आपला नवीन डिवाईस क्यू7 भारतात पण लॉन्च केला आहे. एलजी ने हा स्मार्टफोन 15,990 रुपयांमध्ये आणला आहे जो 1 सप्टेंबर पासून आॅनलाईन व आॅफलाईन स्टोर्स वर सेल साठी उपलब्ध होईल.
एलजी क्यू7 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो मेटल फ्रेम वर बनला आहे. फोन मध्ये 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 5.5-इंचाचा फुलएचडी+ फुलविजन डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित आहे सोबतच हा 1.5गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर क्लॉक स्पीड वाल्या प्रोसेसर वर चालतो.
कंपनी ने हा फोन 3जीबी रॅम सह सादर केला आहे. फोन मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 2टीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे ज्यात पीडीएएफ फीचर आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
एलजी क्यू7 एलटीई नेटवर्क वर चालतो तसेच यात बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. एलजी क्यू7 आईपी68 रेटिड आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप सी पोर्ट सोबत फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. एलजी क्यू7 अरोरा ब्लॅक आणि मोरोक्कन ब्लू कलर मध्ये 15,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल.
