LG ने यावर्षी आयोजित झालेल्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 मध्ये आपल्या ‘क्यू सीरीज’ मध्ये LG Q60 लॉन्च केला होता. ट्रिपल रियर कॅमेरा आणि पावरफुल प्रोसेसर असलेला हा स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय बाजारात लोकांना आवडला होता. आता या कोरियन कंपनीने आपल्या होम मार्केट मध्ये हि सीरीज वाढवत नवीन डिवाईस LG Q70 पण सादर केला आहे. LG Q70 कोरिया मध्ये भारतीय करंसी नुसार जवळपास 32,500 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो तिथे 6 सप्टेंबर पासून सेल साठी उपलब्ध होईल.
LG Q70 लुक
LG Q70 कंपनीने पंच-होल डिस्प्ले वर सादर केला आहे. फोनच्या दोन्ही कडा बेजल लेस आहेत तर खाली आणि वर बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. LG Q70 च्या डिस्प्ले वर डावीकए छोटासा होल आहे आणि या होल मध्ये फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. LG Q70 चा मागील लुक बऱ्याच अंशी LG Q60 सारखा आहे. इथे कंपनीने ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे जो हॉरिजोन्टल शेप मध्ये आहे.
रियर कॅमेरा सेटअपच्या उजवीकडे फ्लॅश लाईट आहे तसेच खालच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर आहे. बॅक पॅनल वर खालच्या बाजूला LG ची ब्रॅण्डिंग आहे. फोनच्या डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि पावर बटण देण्यात आला आहे तर उजवीकडे गूगल असिस्टंट बटण आहे. LG Q70 च्या खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट सोबत स्पीकर आणि 3.5एमएम जॅक देण्यात आला आहे.
LG Q70 स्पेसिफिकेशन्स
क्यू सीरीजचा हा नवीन फोन कंपनीने 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 2310 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.4-इंचाच्या फुलएचडी+ फुलविजन डिस्प्लेला सपोर्ट करतो. LG Q70 एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 612 जीपीयू आहे.
LG Q70 कंपनीने 4जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी को माइक्रोएसडी कार्डने 2टीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता LG Q70 एलईडी फ्लॅश सह ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/1.8 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे.
त्याचबरोबर LG Q70 मध्ये 13-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी हा फोन 16-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. LG Q70 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. कंपनीने LG Q70 मिलिट्री ग्रेड MIL-STD 810G सर्टिफिकेशन सह सादर केला आहे जो फोनच्या मजबूतीची साक्ष देतो.
LG Q70 मध्ये सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन क्यूसी 3.0 फास्ट चार्जिंग सपोर्ट वाल्या 4,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो. कोरिया मध्ये LG Q70 ब्लॅक मिरर कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे. पण LG Q70 इंडियन मार्केट मध्ये येईल कि नाही हे अजून स्पष्ट झाले नाही.
