Home बातम्या उंचावरून पडला किंवा पाण्यात पडला तरी बिघडणार नाही मिलिट्री ग्रेड वाला एलजी चा हा फोन

उंचावरून पडला किंवा पाण्यात पडला तरी बिघडणार नाही मिलिट्री ग्रेड वाला एलजी चा हा फोन

टेक कंपनी एलजी ने आज भारतात आपला फ्लॅगशिप फोन जी7 ​थिंक प्लस लॉन्च केला आहे. हा हाईएंड डिवाईस येत्या 10 ऑगस्ट पासून 39,999 रुपयांमध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल. तर दुसरीकडे अंर्तराष्ट्रीय मंचावर पण एलजी ने एक दमदार स्मार्टफोन जगासमोर आणला आहे. एलजी ने दक्षिणा कोरिया मध्ये एलजी क्यू8 (2018) स्मार्टफोन लॉन्च केला आहे जो कंपनी च्या मागच्या वर्षी लॉन्च केलेल्या एलजी क्यू8 चा नवीन वर्जन आहे.

एलजी क्यू8 (2018) चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनची सर्वात मोठी खासियत म्हणजे हा मिलिट्री ग्रेड एमआईएल-एसटीडी 810जी स्टँडर्ड सर्टिफाइड आहे. ही टेक्नोलॉजी फोन ला खुप पावरफुल आणि मजबूत बनवते जी फोन पडल्यावर याला डॅमेज होऊन देत नाही. तसेच एलजी क्यू8 (2018) आईपी68 रेटिड आहे ज्यामुळे हा धूळ आणि पाण्या पासून वाचतो.

एलजी क्यू8 (2018) चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या फुल विजन बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 6.2-इंचाची फुलएचडी+ स्क्रीन देण्यात आली आहे जी 2160 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशनला सपोर्ट करतो. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे जो आॅक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने या फोन मध्ये 4जीबी रॅम मेमरी दिली आहे तसेच ग्राफिक्स हा फोन एड्रेनो 506 जीपीयू ला सपोर्ट करतो. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 2टीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एलईडी फ्लॅश ला सपोर्ट करतो. तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

एलजी ने आपल्या या फोन सोबत एसपेन पण दिला आहे जो यूजर एक्सपीरियंस चांगला करतो. 4जी एलटीई व बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये हाई-फाई क्वॉड डीएसी टेक्नोलॉजी पण देण्यात आली आहे. सिक्योरिटी साठी या फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी फोन मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. दक्षिण कोरिया मध्ये हा फोन भारतीय करंसी नुसार जवळपास 32,990 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे.