Home बातम्या LG Stylo 5 चा नवीन प्रेस रेंडर झाला लीक, बजेट कॅटगरी मध्ये होईल लॉन्च

LG Stylo 5 चा नवीन प्रेस रेंडर झाला लीक, बजेट कॅटगरी मध्ये होईल लॉन्च

गेल्या वर्षी एलजी ने आपल्या स्टाइलो सीरीज मध्ये Stylo 4 स्मार्टफोन सादर केला होता. साउथ कोरियन टेक कंपनी आता या सीरीज मध्ये येणाऱ्या नवीन हँडसेट वर काम करत आहे, जो LG Stylo 5 म्हणून सादर होईल. लॉन्चच्या आधी हा फोन ग्लोबल सर्टिफिकेशन फोरम वर दिसला होता. त्यानंतर फोनचे रेंडर्स इंटरवेब्स वर दिसले आहेत. आता फोनचे हाई-रेजोल्यूशन प्रेस रेंडर ऑनलाइन समोर आले आहेत.

लेटेस्ट लीक फोटो मध्ये स्मार्टफोन स्लिवर कलरचा दिसत आहे. हँडसेट 18:9 डिस्प्ले सोयाबीतच बाजूला स्लिम बेजल आणि बॉटम व टॉप थिक बेजल आहेत. फोन मध्ये रियर व फ्रंट वर सिंगल कॅमेरा असेल. तसेच फोन मध्ये रियर वर फिंगरप्रिंट सेंसर दिसत आहे. तसेच हँडसेट मध्ये पावर बटण राइट साइड आणि वॉल्यूम रॉकर बटन लेफ्ट मध्ये दिसत आहेत. फोनच्या इतर फीचर्सची माहिती समोर आली नाही.

मागच्या वर्षी लॉन्च झालेल्या एलजी स्टाइलो 4 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन 18:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 2160 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.2-इंचाचा फुलएचडी+ फुलविजन डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित आहे जो 1.8गीगाहर्ट्ज़ आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 425 चिपसेट वर चालतो.

कंपनी ने हा फोन 2जीबी रॅम सह सादर केला जाऊ. एलजी स्टाइलो 4 मध्ये 32जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 2टीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 5-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे.

एलजी स्टाइलो 4 मध्ये डुअल सिम व 4जी वोएलटीई सह बेसिक कनेक्टिविटी फीचर्स आहेत. एलजी स्टाइलो 4 ला कंपनी ने स्टाइलस पेन सह सादर केले आहे. सिक्योरिटी साठी या फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये यूएसबी टाईप-सी सह फास्ट चार्जिंग सपोर्ट वाली 3,300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.