Home बातम्या 5 कॅमेरा सेंसर सह लॉन्च झाला एलजी वी40 थिंक, याचा वेग देईल आयफोनला टक्कर

5 कॅमेरा सेंसर सह लॉन्च झाला एलजी वी40 थिंक, याचा वेग देईल आयफोनला टक्कर

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एलजी ने आपल्या वी सीरीजचा फ्लॅगशिप स्मार्टफोन वी40 थिंक आॅफिशियली लॉन्च केला आहे. एलजी ने न्यूयार्क मध्ये आयोजित एका ईवेंट च्या माध्यामातून वी40 थिंक टेक बाजारात सादर केला आहे. एलजी ने आधीच सांगितले होते की वी40 थिंक फक्त एलजी कंपनीचा नव्हे तर टेक मार्केट मधील पण खुप खास फोन असेल. एलजी ने आपला हा फोन 5 कॅमेरा सेंसर सह लॉन्च केला आहे ज्याच्या बॅक पॅनल वर 3 आणि फ्रंट पॅनल वर 2 कॅमेरा सेंसर आहेत.

एलजी वी40 थिंक ची सर्वात मोठी यूएसपी फोनचा कॅमेरा सेग्मेंट आहे. हा फोन ट्रिपल रियर कॅमेरा आणि ​डुअल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.5 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/1.9 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा वाइड एंगल सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आली आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 8-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे क्रमश: एफ/1.9 अपर्चर तसेच एफ/2.2 अपर्चर सह येतात. एआई टेक्नोलॉजी असलेल्या वी40 थिंक चा कॅमेरा सेटअप मध्ये पण एआई टेक्नोलॉजी आहे त्याचबरोबर यात आर्कषक फिल्टर्स व मोड्स आहेत

एलजी वी40 थिंक चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 3,120 x 1,440 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.4-इंचाचा क्यूएचडी+ ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एलजी यूआई सह एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे सोबतच हा क्वालकॉम च्या सर्वात ताकदवान चिपसेट 845 वर चालतो.

कंपनी ने फोन 6 जीबी रॅम सह सादर केला आहे. हा फोन 6जीबी रॅम सोबत 64जीबी तसेच 128जीबी स्टोरेज च्या दोन वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे. एलजी वी40 थिंक च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. हा फोन आईपी68 रेटिड ज्यामुळे हा पाणी आणि धुळ यापासून वाचतो. बेेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत फोन मध्ये 3300एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

एलजी वी40 थिंक न्यूयार्क मध्ये ब्लक, ग्रे, ब्लू ​तसेच रेड कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. एलजी ने आपल्या फोनची ग्लोबल किंमत 900 यूस डॉलर ठेवली आहे जी भारतीय करंसी अनुसार जवळपास 73,000 रुपये आहे. यूएस मध्ये हा फोन 18 ऑक्टोबर पासून सेल साठी उपलब्ध होईल. पण एलजी वी40 थिंक च्या इंडिया लॉन्च बद्दल अजूनतरी कंपनीने कोणतीच माहिती दिली नाही.