इंडियन स्मार्टफोन मार्केट साठी हे वर्ष खूप बदल घेऊन आला आहे. एकीकडे Realme आणि Xiaomi सारख्या कंपन्या आपल्या बजेट स्मार्टफोन्सच्या जीवावर लाखो यूजर्स आपल्या ब्रँडशी जोडत आहेत तर Samsung ने भारतीय बाजारासाठी खास Galaxy M सीरीज सादर करून स्मार्टफोन सेग्मेंट मध्ये मोठा बदल घडवला आहे. आता यात टेक कंपनी LG ची भर पडली आहे. LG ने पण इंडियन स्मार्टफोन बाजारात आपली योजना बदलली आहे आणि नवीन स्ट्रॅटेजी आजमावली आहे. या स्ट्रॅटेजी अंतर्गत कंपनीने भारतात अगदी नवीन ‘W’ सीरीजची सुरवात केली आहे. या स्वस्त व दमदार सीरीजची सुरवात करत कंपनीने आज भारतात एक साथ तीन नवीन फोन LG W10, LG W30 आणि LG W30 Pro लॉन्च केले आहेत.
अश्या आहेत किंमती
सर्वात आधी किंमतीबद्दल बोलायचे तर LG W10 या सीरीजचा सर्वात स्वस्त फोन आहे. कंपनीने हा डिवाईस 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. त्याचप्रमाणे LG W30 एलजीने 9,999 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे. W सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल LG W30 Pro बद्दल बोलायचे तर कंपनीने या डिवाईसची किंमत अजूनपर्यंत सांगितली नाही. हा स्मार्टफोन याइतया काही आठवड्यांत भारतात सेल साठी उपलब्ध होईल. तसेच LG W10 आणि LG W30 चा पहिला फ्लॅश सेल शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर येत्या 3 जुलैला होईल.
LG W10
LG W सीरीजच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोन LG W10 बद्दल बोलायचे तर हा 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 6.19-इंचाच्या एचडी+ नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर केला आहे जो 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.
LG W10 कंपनी द्वारा 3जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन 32जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड द्वारे वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता LG W10 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आहे.
सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी LG W10 मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. एलजी चा हा नवीन स्मार्टफोन 4जी एलटीई व डुअल सिमला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरने सुसज्ज आहे. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी LG W10 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन देशात टुलीप पर्पल आणि स्मॉकी ग्रे कलर मध्ये विकला जाईल.
LG W30 / W30 Pro
LG W सीरीजचा हा स्मार्टफोन कंपनीने 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 6.26-इंचाच्या एचडी+ फुलविजन डॉट नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने LG W30 3जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज वर लॉन्च केला आहे तर LG W30 Pro मध्ये 4जीबी रॅम आणि 64जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे.
हे देखील वाचा: जगातील पहिला 64-एमपीचा कॅमेरा असलेला फोन आला समोर, बघा या अनोख्या फोनची पहिली झलक
एंडरॉयड 9 पाई आधारित LG W30 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो. तर LG W30 Pro 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 14एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 632 चिपसेट वर चालेल.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हे दोन्ही स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. LG W30 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा लो लाईट कॅमेरा, 8-मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस आणि 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे W30 Pro मॉडेल 13 + 5 + 8 च्या रियर कॅमेरा सेंसर्सला सपोर्ट करतो. सेल्फी साठी या स्मार्टफोन मॉडेल्स मध्ये 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
हे देखील वाचा: शाओमी सादर करणार आहे 5 नवीन प्रॉडक्ट, बघा स्मार्टफोन व्यतिरिक्त अजून काय काय होणार आहे लॉन्च
LG W30 आणि LG W30 Pro डुअल सिम सह 4जी एलटीई ला सपोर्ट करतात. सिक्योरिटी साठी हे फोन मॉडेल रियर फिंगरप्रिंट सेंसर सह फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतात. तसेच पावर बॅकअप साठी LG W10 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे LG W30 Pro स्टीरियो साउंड प्लस टेक्नोलॉजी सह येतो ज्यात फोनच्या डिस्प्ले मधून आवाज येईल.
