Home बातम्या 56 नव्हे 65 दिवस वापरता येईल ‘हा’ प्रीपेड प्लॅन; स्वस्तात अनलिमिटेड कॉलिंग आणि भरपूर डेटा

56 नव्हे 65 दिवस वापरता येईल ‘हा’ प्रीपेड प्लॅन; स्वस्तात अनलिमिटेड कॉलिंग आणि भरपूर डेटा

भारतीय ग्राहकांना जितका त्रास 28 दिवसांच्या रिचार्ज प्लॅन्सचा होतो त्याहून कितीतरी त्रास 56 दिवसांच्या पॅकचा होतो. या पॅकमध्ये जास्त पैसे देऊन देखील संपूर्ण 2 महिने किंवा 60 दिवसांची वैधता मिळत नाही. उलट Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea (Vi) सारख्या तिन्ही प्रायव्हेट टेलीकॉम कंपन्या अशा प्लॅन्समधून चार दिवस कमी करतात. त्यामुळे 12 महिन्यांच्या ऐवजी 13 महिने रिचार्ज करावा लागतो. जर तुम्ही देखील कमी वैधता असलेल्या महाग प्लॅन्सना थकला असाल तर आज आम्ही एक असा Prepaid Plan घेऊन आलो आहोत जो फक्त 319 रुपयांमध्ये 65 दिवसांची वॅलिडिटी देतो. हा BSNL चा Plan आहे जो अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सोबतच भरपूर Data देखील देत आहे.

BSNL Rs 319 Plan

भारतातील सरकारी टेलीकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेडचा हा 319 रुपयांचा प्लॅन प्रीपेड युजर्ससाठी बनवण्यात आला आहे. हा काही नवीन प्लॅन नाही तर काही दिवसांपूर्वी बीएसएनएलनं ग्राहकांसाठी हा सादर केला होता. 319 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनचे बेनिफिट्स पाहता याची सर्वात मोठी खासियत प्लॅनसोबत मिळणारी 65 दिवसांची वॅलिडिटी आहे जी BSNL ला Jio, Airtel आणि Vi पेक्षा चांगली बनवते.

प्रायव्हेट टेलीकॉम कंपन्या जिथे महिन्यातील 2-3 दिवस कमी करून फायदा मिळवत आहेत आणि ग्राहकांवर अतिरिक्त ओझं टाकत आहेत, तर दुसरीकडे बीएसएनएलनं या किंमतीत दोन महिन्यांपेक्षा जास्त वॅलिडिटी देऊन फॅन्सना मोठी भेट दिली आहे. ज्या लोकांना कमी किंमतीत रिचार्ज करून जास्त दिवसांची वैधता हवी आहे त्यांच्यासाठी हा 319 रुपयांच्या बीएसएनएल प्लॅन चांगला ऑप्शन ठरू शकतो. फक्त Long Validity च नव्हे तर हा प्लॅन अनेक अन्य बेनिफिट्ससह येतो ज्यांची माहिती पुढे देण्यात आली आहे.

कॉल आणि डेटा बेनिफिट

BSNL Prepaid Plan मध्ये मिळणार इतर फायदे पाहता ही कंपनी 319 रुपयांमध्ये आपल्या ग्राहकांना 65 दिवसांसाठी अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंगची सुविधा देत आहे. कंपनीनं 319 रुपयांचा प्लॅन Voice Voucher नावानं सादर केला आहे तसेच यात तुम्ही संपूर्ण देशात कोणत्याही नंबर व नेटवर्कवर फ्री कॉल करू शकता. म्हणजे BSNL युजर कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना Jio, Airtel किंवा Vi कंपनीच्या कोणत्याही नंबरवर बिनदास्त गप्पा मारू शकतात. हे व्हॉइस कॉल रोमिंगमध्ये देखील मोफत असतील.

अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग सोबतच बीएसएनएल या प्रीपेड प्लॅनमध्ये आपल्या ग्राहकांना 10GB Data देखील देत आहे. हा इंटरनेट डेटा कोणत्याही डेली लिमिटविना येतो ज्याचा वापर 65 दिवसांच्या आत करता येतो. तसेच BSNL कडून 319 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना 99 SMS देखील दिले जात आहेत. या एसएमएसचा वापर देखील देशातील कोणत्याही नेटवर्कवर केला जाऊ शकतो, जे लोकल व एसटीडी दोन्ही नंबर्सवर मोफत असतील.

BSNL Prepaid Plan फायदेशीर आहे का?

बीएसएनएल के 319 रुपयांच्या प्लॅनचे फायदे आणि तोटे पाहता या प्लॅनची सर्वात मोठी खासियत म्हणजे यातील मोठी वॅलिडिटी आणि अनलिमिटेड व्हॉइस कॉल. 319 रुपयांमध्ये 65 दिवस अनलिमिटेड कॉलिंग करण्याची संधी मिळते. जियो, एयरटेल आणि विआयकडे असा फायदा मिळत नाही.

तर दुसरीकडे BSNL कडून मिळणारा 10 जीबी डेटा इतका जास्त नाही परंतु हा प्लॅन त्या लोकांसाठी खूप उपयुक्त ठरू शकतो ज्यांच्या घरी आणि ऑफिसमध्ये वायफाय आहे. जे लोक आपला स्मार्टफोन वायफायशी कनेक्टेड ठेवतात त्यांच्यासाठी हा 10 जीबी डेटा बाहेर पडल्यावर उपयोगी पडेल. असे लोक कमी खर्चात आपलं सिम या प्लॅनच्या मदतीनं अ‍ॅक्टिव्ह ठेवू शकतात.