रियलमीने आज भारतात आपला नवीन स्मार्टफोन सादर करत realme NARZO N65 5G लाँच केला आहे. हा एक स्वस्त मोबाईल आहे ज्याला डिस्काऊंटसह फक्त 10,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. नारजो एन 65 5 जी फोनमध्ये 50MP Camera आणि 5000mAh Battery सारखे स्पेसिफिकेशन आणि IP54 आणि Rainwater Smart Touch सारखे फिचर्स मिळतात. या लो बजेट स्मार्टफोनची संपूर्ण माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.
Realme Narzo N65 5G ची किंमत
- 4GB RAM + 128GB Storage – ₹11,499
- 6GB RAM + 128GB Storage – ₹12,499
रियलमीचा नवीन नारजो एन 65 5 जी फोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. याच्या बेस मॉडेलमध्ये 4 जीबी रॅम देण्यात आली आहे ज्याची किंमत 11,499 रुपये आहे. तसेच मोठा व्हेरिएंट 6 जीबी रॅमसह 12,499 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. हे दोन्ही मॉडेल 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतात. सुरुवाती सेलमध्ये या फोनवर 1000 रुपयांचा डिस्काऊंट पण मिळेल. realme NARZO N65 5G ला 31 मे ते Amber Gold आणि Deep Green कलरमध्ये अॅमेझॉनवरून विकत घेता येईल.
realme NARZO N65 5G चे स्पेसिफिकेशन
- 6.67″ 120 हर्ट्झ डिस्प्ले
- मीडियाटेक डायमेंसिटी 6300
- 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज
- 50 एमपी ड्युअल रिअर कॅमेरा
- 15 वॉट 5,000 एमएएच बॅटरी
स्क्रीन : realme Narzo N65 5G फोन 720 x 1604 पिक्सल रेजोल्यूशन असणाऱ्या 6.67-इंचाच्या एचडी डिस्प्लेवर लाँच झाला आहे. ही पंच-होल स्टाईल असणारी स्क्रीन आहे जी 120Hz रिफ्रेश रेटवर चालते. या फोनच्या स्क्रीनवर 625nits ब्राईटनेस पण मिळते.
प्रोसेसर : रियलमी नारजो एन 65 5 जी फोन MediaTek Dimensity 6300 5G ऑक्टाकोर प्रोसेसर वर लाँच झाला आहे. ही 6 नॅनोमीटर फेब्रिकेशनवर बनलेला मोबाईल चिपसेट आहे जो 2.4GHz पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये Arm Mali G57 MC2 GPU आहे.
मेमरी : हा रियलमी मोबाईल 4 जीबी रॅम तसेच 6 जीबी रॅममध्ये दोन मॉडेलमध्ये लाँच झाला आहे. हे दोन्ही व्हेरिएंट 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात. फोनमध्ये 6GB Dynamic RAM पण मिळते, जी फिजिकल रॅमसह मिळून NARZO N65 5G ला 12 जीबी रॅमची ताकद देते. या मोबाईलमध्ये 2TB चे कार्ड लावले जाऊ शकते.
कॅमेरा : realme NARZO N65 5G फोन ड्युअल रिअर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50MP मेन सेन्सर देण्यात आला आहे जो 26mm फोकल लेंथ तसेच 80° FOV ला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा मोबाईल एफ/2.0 अपर्चर असलेला 8MP Front camera ला सपोर्ट करतो.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी रियलमी नारजो एन 65 5 जी फोन 5,000mAh Battery ला सपोर्ट करतो. तसेच बॅटरीला फास्ट चार्ज करण्यासाठी स्मार्टफोनमध्ये 15W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. फोनमध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट मिळतो.
ओएस : realme NARZO N65 5G फोन सर्वात नवीन आणि अॅडव्हान्स ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉईड 14 वर लाँच झाला आहे जो realme UI 5.0 सह मिळून चालतो. हा मोबाईल 2 वर्षाचे सॉफ्टवेअर अपडेट तसेच 3 वर्षाच्या सिक्योरिटी अपडेटसह सादर करण्यात आला आहे.
वॉटरप्रूफिंग : रियलमी नारजो एन 65 5 जी फोनला IP54 रेटिंगसह बाजारात आणले आहे. कंपनी या फोन फिचरला खूप ठळकपणे प्रमोट करत आहे. तसेच मोबाईलमध्ये Rainwater Smart Touch टेक्नॉलॉजी पण मिळते, ज्याच्यासोबत हाथ ओले झाल्यावर पण स्क्रीन टच बरोबर चालतो. या फोनची जाडी फक्त 7.89mm आणि वजन फक्त 190 ग्रॅम आहे.
