अॅप्पल ने मागच्या वर्षी आपल्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त कंपनीचा हाईएंड डिवाईस आयफोन 10 लॉन्च केला होता, जो जगातील पहिला नॉच बेजल लेस डिसप्ले वाला फोन आहे. आयफोन 10 दिसायला जितका शानदार आहे त्याची किंमत पण तेवढीच जास्त आहे. 1 लाखा पेक्षा जास्त किंमत असणार्या आयफोन 10 बद्दल अनेक विनोद आणि मीम पण बनले आहेत. कोणी यासाठी किडनी विकण्याचा विनोद करत आहे तर कोणी गर्लफ्रेंडचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आयफोन 10 ची चोरी करण्याच्या कमेंट्स देत आहे. पण अॅप्पल संबंधित आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे की ज्यात एका व्यक्तिने पैसे व दागिन्यां ऐवजी अॅप्पल च्या आयफोन 10 ची चोरी केली ज्यांची किंमत 85 लाखांपेक्षा जास्त आहे.
न्यूज एजेंसी एएनआई कडून आलेल्या बातमी नुसार मागच्या शुक्रवारी दिल्ली अंर्तराष्ट्रीय एयरपोर्ट वर एक व्यक्ती पर 100 अॅप्पल आयफोन 10 सह पकडला गेला ज्याने अवैध रित्या हे फोन भारतात घेऊन आला होता. रिपोर्ट नुसार या व्यक्ति चे वय जवळपास 53 वर्ष आहे आणि साल कस्टम विभाग ने याला आयफोन 10 च्या 100 यूनिट च्या तस्करी च्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल कारण या व्यक्ति कडील अॅप्पल आयफोन 10 ची किंमत 85,61,169 रुपयांच्या आसपास आहे.
Custom officers seized 100 Apple iPhone X from valued at Rs 85,61,169, from passenger at Delhi's Indira Gandhi International airport; Passenger arrested, further investigation is underway. pic.twitter.com/ieWDnov4HR
— ANI (@ANI) May 6, 2018
85 लाख पेक्षा जास्त किंमत असणार्या अॅप्पल आयफोन 10 सह पकडला गेलेला हा व्यक्ति सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. कस्टम विभागाची टीम हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की अॅप्पल आयफोन 10 चे 100 यूनिट राष्ट्रीय राजधानी मध्ये आणण्यामागे या व्यक्तिचा नेमका हेतू काय असावा. तसेच हा व्यक्ति आयफोन ची तस्करी कोणासाठी आणि कधीपासून करत आहे हे माहीत करून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
पण 1 लाखापेक्षा जास्त किंमत असणार्या आयफोन 10 च्या बाबतीत या प्रकाराच्या काळाबाजारीची काही प्रकरणे याआधी पण समोर आले आहेत. विशेष म्हणजे 2018 च्या पहिल्या तिमाहीत अॅप्पल आयफोन 10 जगातील सर्वात जास्त विकला जाणारा स्मार्टफोन ठरला होता आणि भारतात पण या फोनचे चाहते पण जास्त आहेत. फोनची जास्त डिमांड पाहता आयफोन 10 ची ही काळाबाजारी केली जात आहे असे दिसत आहे.
सांगायची बाब म्हणजे दुबई मध्ये अॅप्पल आयफोन 10 च्या 256जीबी स्टोरेज वाल्या वेरिएंट ची किंमत 81,775 रुपये आहे तर हा वेरिएंट भारतात 1,05,720 रुपयांना विकला जातो. त्यामुळे जर पकडले गेलेले आयफोन 256जीबी वाले असतील तर या 100 अॅप्पल आयफोन 10 ची भारतातील किंमत 1 कोटीच्या वर जाईल.
