Home बातम्या 108MP पेंटा कॅमेरा, 5,260एमएएच बॅटरी आणि मोठ्या स्क्रीन सह आला Mi CC9 Pro, Realme च्या अडचणी वाढल्या

108MP पेंटा कॅमेरा, 5,260एमएएच बॅटरी आणि मोठ्या स्क्रीन सह आला Mi CC9 Pro, Realme च्या अडचणी वाढल्या

चिनी स्मार्टफोन कंपनी Xiaomi ने आज आपल्या घरच्या मार्केट मध्ये Mi CC9 Pro लॉन्च केला आहे. या फोन सोबत कंपनीने Mi Smart Watch आणि Mi TV 5 Series पण सादर केली आहे. Xiaomi च्या या हँडसेट Mi CC9 Pro ची खासियत हँडसेट मधील पेंटा-लेंस कॅमेरा सेटअप आहे. यात 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर आहे. चीनच्या बाहेर इतर मार्केट मध्ये हँडसेट Mi Note 10 नावाने येईल.

विशेष म्हणजे मी सीसी9 सीरीज अंतर्गत सर्वात आधी चीन मध्ये Mi CC9 आणि Mi CC9e स्मार्टफोन लॉन्च केला गेला होता आणि आता या सीरीज मध्ये Mi CC9 Pro लॉन्च केला गेला आहे.

डिस्प्ले आणि डिजाइन

Mi CC9 Pro ची डिजाइन पाहता यात ऐज-टू-ऐज कर्व्ड ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे जो वॉटरड्रॉप नॉच सह येतो. सोबतच फोन मध्ये इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेंसर आहे. याव्यतिरिक्त फोनच्या मागे वर्टिकल पेंटा कॅमेरा सेटअप आहे. Mi CC9 Pro मध्ये 6.47 इंचाचा फुल-एचडी+ (1080 x 2340 पिक्सल) ओलेड कर्व्ड-एज डिस्प्ले आहे.

प्रोसेसर, रॅम व स्टोरेज

Mi CC9 Pro मध्ये स्मार्टफोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी प्रोसेसर देण्यात आला आहे. हा प्रोसेसर काही दिवसांपूर्वी Realme X2 मध्ये पण देण्यात आला होता. 6जीबी व 8जीबी रॅम सोबत 128जीबी व 256जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

पेंटा कॅमेरा

तसेच फोन मध्ये पाच रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. यात एफ/ 1.69 अपर्चर असलेला 108 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे जो ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सह येतो. सोबतच कॅमेरा सेटअप मध्ये सर्वात वर 10x हाइब्रिड जूम 8 मेगापिक्सलचा सेंसर आहे. याच्या खाली 12 मेगापिक्सलचा 50एमएम पोर्ट्रेट कॅमेरा, चौथा 20 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि पाचवा 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी

फोन मध्ये हाई-रेज ऑडियो ऑप्शन देण्यात आला आहे. तसेच यात NFC सपोर्ट पण आहे. फोन मध्ये 5,260 एमएएच ची बॅटरी असेल जी 30 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

किंमत

Mi CC9 Pro ची किंमत पाहता याच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 2,799 (जवळपास 28,000) रुपये आहे. तर याच्या 8GB रॅम + 128GB स्टोरेज आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेज वेरिएंटची किंमत क्रमश: RMB 3,099 (जवळपास 31,000 रुपये) आणि RMB 3,499 (जवळपास 35,000 रुपये) आहे. Mi CC9 Pro व्हाईट, ग्रीन आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये सादर केला गेला आहे.

शाओमी मी टीव्ही 5 सीरीज

चीन मध्ये झालेल्या इवेंट मध्ये कंपनीने Mi TV 5 Series पण लॉन्च केली आहे. Mi TV 5 55 इंच, 65 इंच आणि 75 इंचाच्या वेरियंट मध्ये येतात. या टीव्ही मध्ये शाओमीने डेव्हलप केलेला पॅचवॉल इंटरफेस आहे. तसेच टीव्ही मध्ये 3जीबी रॅम सह 32जीबी इंटरनल स्टोरेज पण आहे. टीव्ही मध्ये शानदार साउंड आउटपुट साठी 8 वॉट चे दोन स्पीकर्स सह डॉल्बी ऐटमॉस आणि डीटीएस सपॉर्ट देण्यात आला आहे.

55-इंचाच्या मॉडेलची किंमत RMB 2,999 (जवळपास Rs 30,250), 65-इंच मॉडेलची किंमत RMB 3,999 (जवळपास Rs 40,400) आणि 75-इंच मॉडेलची किंमत RMB 7,999 (जवळपास Rs 80,700) आहे.

शाओमी मी स्मार्ट वॉच

Xiaomi ने या इवेंट मध्ये Mi Watch लॉन्च केला आहे. हा कंपनीचा पहिला ट्रू स्मार्टवॉच आहे. डिजाइनच्या बाबतीत शाओमी Mi वॉच, ऍप्पलच्या स्मार्टवॉचशी मिळत जुळता आहे. शाओमी वॉच मध्ये AMOLED कर्व्ड टचस्क्रीन डिस्प्ले, हार्ट रेट मॉनिटर सारखे अनेक शानदार फीचर आहेत. तसेच यात शाओमीचा XiaoAI असिस्टेंट इन-बिल्ट देण्यात आला आहे. चीन मध्ये याची किंमत 1299 युआन (जवळपास 13,000 रुपये) आहे.