Home बातम्या Xiaomi च्या या स्मार्टफोन्सना सर्वात आधी मिळेल MIUI 12 चा अपडेट, तुमचा फोन आहे का या यादीत

Xiaomi च्या या स्मार्टफोन्सना सर्वात आधी मिळेल MIUI 12 चा अपडेट, तुमचा फोन आहे का या यादीत

चीनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीने आज आपल्या घरच्या मार्केट मध्ये नवीन फोन Mi 10 Youth Edition सादर केला आहे. त्याचबरोबर कंपनीने ऍडव्हान्स फीचर्स असलेला नवीन यूजर इंटरफेस MIUI 12 पण लॉन्च केला आहे. शाओमीच्या नवीन मीयूआई मध्ये फोन्स मध्ये गोपनीयता आणि ऍनिमेशन सारख्या शानदार फीचर्स सह वेगवान आणि स्मूद प्रोसेसिंग मिळेल.

एमआईयूआई 12 मध्ये यूजर इंटरफेस खूप बदलण्यात आला आहे आणि डार्क मोड सह फिटनेस फीचर सारखे अनेक मोड्स देण्यात आले आहेत. सध्या हा बीटा परीक्षणासाठी खुला आहे. यूजर्स अपडेट करण्यासाठी ऍप स्टोर वर जाऊ शकतात, अश्याप्रकारे यातील फीचर्स अनुभवता येतील.

MIUI 12 ची रिलीज डेट आणि उपलब्धता

Xiaomi नुसार MIUI 12 चा स्टेबल वर्जन जून 2020 च्या शेवटी रोल आउट केला जाईल. सध्या याची बीटा टेस्टिंग चीन मध्ये खुली झाली आहे. MIUI 12 अपडेट मिळवणाऱ्या डिवाइस मध्ये शाओमी आणि रेडमी दोन्हीच्या हँडसेटचा समावेश आहे. नवीन मीआईयूआई 12 चा अपडेट काही जुन्या डिवाइसना पण मिळेल जे महत्वाचे आहे. चाल जाणून घेऊया कोणत्या फोन्सना मिळेल MIUI 12 चा अपडेट.

Redmi च्या या फोन्सना मिळेल MIUI 12 चा अपडेट

सर्वात आधी आपण बोलूया शाओमीच्या सब ब्रँड Redmi च्या फोन्स बद्दल. रेडमी ब्रँडच्या Redmi K30 Pro, Redmi K30 5G, Redmi K30 4G, Redmi K20 Pro, Redmi K20, Redmi Note 8 Pro, Redmi Note 7 Pro, Redmi Note 7 आणि Redmi Note 5 स्मार्टफोनचा समावेश आहे. तसेच येत्या काळात या लिस्ट मध्ये आणखीन फोन्सचा समावेश होईल.

Xiaomi च्या या फोन्सना मिळेल MIUI 12 चा अपडेट

शाओमीचे फोन्स पाहता Mi CC9 Pro, Mi CC9, Mi CC9 Meitu Custom Edition, Mi 10 Pro, Mi 10, Mi 10 Youth Edition, Mi 9 Pro 5G, Mi 9, Mi 9 SE, Mi 8 Screen Fingerprint Edition, Mi 8 Youth Edition, Mi 8 Explorer Edition, Mi 8 SE, Mi 8, Mi 6, Mi 6X, Mi Mix 3, Mi Mix 2s, Mi Mix 2, Mi Note 3 आणि Mi Max 3 ला नवीन MIUI 12 चा अपडेट दिला जाईल.

सर्वात आधी या फोन्सना मिळेल अपडेट

Xiaomi Mi 10

Xiaomi Mi 10 Youth Edition

Xiaomi Mi 9 Pro

Redmi K30 Pro

Redmi K30

Redmi K20 Pro

Redmi K20

Note: लक्षात असू द्या कि यादी चीन मधील फोन्सना लक्षात ठेऊन कंपनीने प्रसिद्ध केली आहे. ग्लोबली स्मार्टफोन्ससाठी वेगळी यादी येईल. नवीन मीयूआई जून पासून वरील स्मार्टफोन्स वर अपडेट होण्यास सुरवात होईल.